कोकण

वीर गावातील पुलाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार

CD

- rat२४p७.jpg-
26O39344
चिपळूण ः वीर येथील संभाव्य पुलाच्या जागेची पाहणी करताना जिल्हा परिषद सदस्या शिवानी सावंत. सोबत पक्षाचे पदाधिकारी.

वीर गावातील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार
शिवानी सावंत यांनी केली पाहणी ; दळणवळणावर परीणाम
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २४ ः तालुक्यातील वहाळ जिल्हा परिषद गटातील वीर गावातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या पुलाचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या शिवानी संदीप सावंत यांनी प्रत्यक्ष दऱ्याखोऱ्यात उतरून पाहणी केली. तेथील ग्रामस्थांशी चर्चा करून पूल उभारण्याचे आश्वासनही दिले.
वीर बौद्धवाडी ते चर्मकारवाडी या परिसराला जोडणारा पूल अनेक वर्षांपासून रखडला आहे. या पुलाअभावी स्थानिक ग्रामस्थांना दळणवळण, शिक्षण, आरोग्य सेवा आणि दैनंदिन व्यवहारांसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिवानी सावंत यांनी प्रत्यक्ष या जागेला भेट देऊन पुलाच्या संभाव्य जागेची पाहणी केली आणि ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी बोलताना शिवानी सावंत म्हणाल्या, ‘पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली या पुलाच्या मंजुरीसाठी लवकरात लवकर प्रयत्न केले जातील. हा प्रश्न तातडीने मार्गी लावून ग्रामस्थांची गैरसोय दूर केली जाईल.’ त्यांच्या या शब्दाने ग्रामस्थांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पाहणी दौऱ्यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप सावंत, पंचायत समिती सदस्य संजय जावळे, वीर ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष दीपक पवार, यशवंत दुर्गोळी गावकर, रत्नू बेंडल, सूर्यकांत दुर्गोळी, देवू दुर्गोळी, राहुल चेके, प्रदीप रेपाल यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
------
संपर्क यंत्रणा सक्षम करण्यावर भर
वीरदेवपाठ ते वीर या दोन महत्त्वाच्या गावांना जोडणारा हा पूल साकारल्यास संपूर्ण परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे. वाहतुकीची सोय आणि ग्रामीण भागातील संपर्क यंत्रणा अधिक सक्षम होणार असल्याने या पुलाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक वर्षांनंतर लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष जागेवर येऊन दखल घेतल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress NCP Merger: काँग्रेसकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव?, तीन आमदार भाजपच्या वाटेवर?

RBI च्या निर्णयाचा परिणाम! SBI आणि बँक ऑफ बडोदाकडून व्याजदरात वाढ; पण कोणत्या आणि किती?

गिग वर्कर्ससाठी मोठी खुशखबर! नवीन e-Shram पोर्टल झालं सुरू; २१ जूनपर्यंतच करता येणार नोंदणी, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Pune Gun Firing Case : सहकारनगरमधील गोळीबार प्रकरण; अल्पवयीन मुलांना हाताशी धरून केला गोळीबार

Pune Water Cut : पुण्यात सोमवारपासून पाणी कपात; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT