कोकण

कोंडिवळे गोतावडेवाडी शाळेचा सन्मान

CD

rat२४p८.jpg-
26O39345
कोंडिवळे : गोतावडेवाडी शाळेत जिल्हा परिषद सदस्य प्रतीक मटकर यांचा सन्मान करताना मुख्याध्यापिका मुग्धा कुळ्ये. सोबत गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले.

कोंडिवळे शाळेला ‘आदर्श’चा बहुमान
प्रतीक मटकर ः जिल्हा परिषद शाळेची झेप
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २४ : ‘जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत आहे, ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. या गटातील शाळांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य प्रतीक मटकर यांनी केले.
कोंडिवळे गोतावडेवाडी शाळेला जिल्हा परिषदेचा यंदाचा ‘आदर्श शाळा पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्याध्यापिका मुग्धा कुळये व सहकारी शिक्षिका आरती देसाई यांचा मटकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ पार पडला. तसेच गणित ऑलिम्पियाड, मंथन प्रज्ञाशोध, ब्रेन डेव्हलपमेंट, सिंधुरत्न टॅलेंट सर्च आणि राजापूर शिष्यवृत्ती परीक्षा अशा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रतीक मटकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये मानस महेंद्र धावडे याने यश मिळवत अव्वल क्रमांक पटकावल्याबद्दल त्याचे कौतुक करण्यात आले. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले, केंद्रप्रमुख रमेश सोगम, विषयतज्ज्ञ श्री. खान, सरपंच प्रशासक रविकांत मटकर यांसह अनेक पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Need This 3 Changes: कर्णधार बदला, दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता अन्... ७ सामने राहिलेत, लवकर पाऊल उचला...

उच्च न्यायालयाचा बँक ऑफ बडोदाला दणका! सायबर फसवणुकीतील पैसे वृद्धेला परत करण्याचे आदेश

'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होते दीपिकाचे वडील; तिचं लग्न झाल्यावर बाथरूममध्ये बसून रडलेले, कोण आहे ती अभिनेत्री?

Alephata Crime : भोंदूगिरीच्या नावाखाली अत्याचार; आळेफाट्यात दोन 'बाबांना' बेड्या

Pune Bribe Case : भूजल सर्वेक्षण विभागातील दोन भूवैज्ञानिक लाच घेताना ताब्यात

SCROLL FOR NEXT