कोकण

रखडलेली विकासकामे मार्गी लावा

CD

swt2418.jpg
39406
सावंतवाडी : शहरातील विकासकामांची जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पाहणी केली.

रखडलेली विकासकामे मार्गी लावा
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे : सावंतवाडी नगरपरिषदेला दिली भेट
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २४ : शहरातील विकासकामे, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि प्रशासकीय कार्यपद्धती अधिक गतिमान करण्यासाठी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी येथील नगरपरिषदेला भेट देऊन सर्व विभागांचा सविस्तर आढावा घेतला.
नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीच्या सुरुवातीला मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विषय सूचीमधील १९ प्रमुख मुद्द्यांवर अधिकारी व कर्मचाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने नगरपरिषदेचे आर्थिक व्यवहार आणि प्रशासकीय पारदर्शकता यांची तपासणी करण्यात आली. केंद्र व राज्य शासनाच्या समाजोपयोगी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शहरात रखडलेली विकासकामे तातडीने मार्गी लावण्याबाबत त्यांनी प्रशासनाला आश्वस्त केले व योग्य मार्गदर्शन केले.
बैठक संपल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष मैदानावर उतरून कामांचा दर्जा तपासला. त्यांनी नगरपरिषदेच्या अग्निशमन केंद्राला भेट देऊन तेथील यंत्रणेची पाहणी केली. तसेच शहरात सुरू असलेल्या इतर विकास कामांच्या ठिकाणी जाऊन कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. ही सर्व विकासकामे दर्जेदार पद्धतीने आणि विहित मुदतीत पूर्ण करावीत, असे कडक निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले. प्रशासकीय सुधारणा आणि लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी ही काळाची गरज आहे. सावंतवाडी नगरपरिषदेने प्रलंबित प्रश्न मार्गी लावून नागरिकांना दर्जेदार सुविधा द्याव्यात अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. या बैठकीला नगरपरिषदेचे विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Need This 3 Changes: कर्णधार बदला, दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता अन्... ७ सामने राहिलेत, लवकर पाऊल उचला...

उच्च न्यायालयाचा बँक ऑफ बडोदाला दणका! सायबर फसवणुकीतील पैसे वृद्धेला परत करण्याचे आदेश

'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होते दीपिकाचे वडील; तिचं लग्न झाल्यावर बाथरूममध्ये बसून रडलेले, कोण आहे ती अभिनेत्री?

Alephata Crime : भोंदूगिरीच्या नावाखाली अत्याचार; आळेफाट्यात दोन 'बाबांना' बेड्या

Pune Bribe Case : भूजल सर्वेक्षण विभागातील दोन भूवैज्ञानिक लाच घेताना ताब्यात

SCROLL FOR NEXT