कोकण

बोगस डॉक्टरांवर कारवाई करा

CD

swt242.jpg
39408
सिंधुदुर्गनगरी: बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर आळा घालण्यासाठी आयोजित जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीच्या सभेत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे. सोबत पोलीस उप अधीक्षक श्वेता खाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी व इतर अधिकारी उपस्थित होते.

बोगस डॉक्टरांवर कारवाई करा
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : पुनर्विलोकन समितीची सभा
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २४ : जिल्ह्यात कोठेही बोगस वैद्यकीय व्यावसायिक प्रॅक्टिस करत असतील, तर त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी. नागरिकांनीही अशा अनधिकृत डॉक्टरांकडून उपचार घेऊन स्वतःचे आरोग्य धोक्यात घालू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.
बोगस वैद्यकीय व्यावसायिकांच्या विरोधात प्रतिबंधात्मक पावले उचलण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या.
या बैठकीला जिल्हा पोलिस उप अधीक्षक श्वेता खाडे, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त एस.पी. यादव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे, मानवाधिकार समितीचे प्रतिनिधी संतोष नाईक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नरोटे उपस्थित होते.

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या, ग्रामीण किंवा शहरी भागात पदवी नसतानाही वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांमुळे सामान्य जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. अशा व्यावसायिकांची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तालुका आरोग्य अधिकारी किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करावी. तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवून संबंधित बोगस डॉक्टरांवर कडक कारवाई केली जाईल. बैठकीत पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासन यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून संशयास्पद दवाखान्यांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पदवीची कागदपत्रे आणि क्लिनिकची नोंदणी याची सखोल पडताळणी करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Need This 3 Changes: कर्णधार बदला, दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता अन्... ७ सामने राहिलेत, लवकर पाऊल उचला...

उच्च न्यायालयाचा बँक ऑफ बडोदाला दणका! सायबर फसवणुकीतील पैसे वृद्धेला परत करण्याचे आदेश

'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होते दीपिकाचे वडील; तिचं लग्न झाल्यावर बाथरूममध्ये बसून रडलेले, कोण आहे ती अभिनेत्री?

Alephata Crime : भोंदूगिरीच्या नावाखाली अत्याचार; आळेफाट्यात दोन 'बाबांना' बेड्या

Pune Bribe Case : भूजल सर्वेक्षण विभागातील दोन भूवैज्ञानिक लाच घेताना ताब्यात

SCROLL FOR NEXT