कोकण

शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरणावर भर द्यावा

CD

- rat२४p१०.jpg-
26O39394
चिपळूण ः मळणी, भात लागवड आणि रोटाव्हेटर यंत्र शेतकऱ्याला सुपुर्द करताना आमदार शेखर निकम. सोबत कृषी विभागाचे अधिकारी व शेतकरी.

खते-बियाणे वेळेत उपलब्ध करा
शेखर निकम ः चिपळूण येथे खरीप हंगाम पूर्व बैठक
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २४ ः ‘खते आणि बियाण्यांची उपलब्धता वेळेवर व्हावी, जेणेकरून शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही, अशा सूचना आमदार शेखर निकम यांनी दिल्या. तसेच शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभागाने तत्पर राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व बैठक मार्कंडी येथील वनभवनमधील फोटो गॅलरी सभागृहात झाली. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार शेखर निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आगामी हंगामाचे नियोजन आणि कृषी योजनांच्या अंमलबजावणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजना, मोहिमा आणि अभियानांचे सादरीकरण करण्यात आले. कृषी यांत्रिकीकरण उप-अभियानांतर्गत दळवटणे येथील शेतकरी रुपेश भुवड यांनी खरेदी केलेल्या ‘मळणी, भात लागवड आणि रोटाव्हेटर यंत्राचे’ लोकार्पण आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार निकम यांनी यंत्राची चावी भुवड यांना सुपूर्द करून त्यांचे अभिनंदन केले. ‘अशा आधुनिक यंत्रांमुळे शेती कामात सुलभता येईल आणि मजुरांची टंचाई भासणार नाही,’र असे मत त्यांनी यावेळी निकम यांनी व्यक्त केले.
या बैठकीस चिपळूण पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत खेतले, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, जिल्हा परिषद सदस्या पूजा शेखर निकम, रावी मोरे, नेहा रहाटे, पंचायत समिती सदस्या स्नेहा साळवी, उज्वला घाग यांसह विविध विभागांचे अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election 2026: विधान परिषद निवडणुकीत मोठा धक्का! पराभूत दिग्गजांना 'नो एंट्री'; भाजपची ‘नो रिपीट’ पॉलिसी लागू

“हा विजय त्यालाच…” ऋतुराज गायकवाड झाला भावूक; मुकेश चौधरीला विजय समर्पित..

काजोलने का तोडला स्वतःच बनवलेला नियम? 'या' सीरिजमध्ये दिला किसिंग सीन, अखेर अभिनेत्रीने सांगितलं कारण

Latest Marathi News Live : राघव चड्ढा यांच्यासह ३ खासदारांचा भाजपात जाण्याचा निर्णय

Western Ghats Biodiversity: पश्चिम घाटात ओडोनाटाच्या १४३ प्रजातींची नोंद; जैवविविधतेत ३५% घट चिंताजनक, दोन वर्षांच्या सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष!

SCROLL FOR NEXT