कोकण

जिल्ह्यात एसटीच्या ७५ निवारा शेडचे बांधकाम

CD

-rat२४p९.jpg-
26O39390
अश्वजित जानराव
-----
एसटीच्या निवारा शेडचे बांधकाम करणार
अश्वजित जानराव ः ७५ प्रस्तावित, महामार्गासह अंतर्गत भागातले निवारे
मकरंद पटवर्धन : सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : जिल्ह्यात एसटीच्या प्रवाशांसाठी उभारलेल्या ७५ हून अधिक मार्ग निवाऱ्यांची दुरुस्ती व नव्याने बांधकाम करण्याची आवश्यकता आहे. एसटीच्या बांधकाम विभागातर्फे याचे सर्वेक्षण करून अहवाल बनवण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने या सर्व निवाऱ्यांचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अश्वजित जानराव यांनी ‘सकाळ’ सोबत बोलताना दिली.
मुंबई- गोवा महामार्ग, रत्नागिरी-कोल्हापूर- नागपूर या महामार्गांचे काम प्रगतिपथावर आहे. यामुळे प्रवाशांना उन्हातान्हात उभे राहावे लागत आहे. त्यामुळे या सर्व अडचणींवर तोडगा काढण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येऊन ७५ मार्गनिवाऱ्यांचे काम होण्यासाठी प्रयत्न आहे. टप्प्याटप्प्याने याचे काम केले जाणार आहे.
लातूर येथे विभाग नियंत्रक असलेल्या श्री. जानराव यांनी रत्नागिरीचे विभाग नियंत्रक म्हणून गेल्या महिन्यात पदभार स्वीकारला व येथे कामावर हजर झाले. त्यानंतर ते सर्व आगार, एसटी स्थानकांना भेट देत आहेत. जिल्ह्याचा परिपूर्ण आढावा ते घेत आहेत. बसेसची संख्या, चालक, वाहक, कारागीर व कर्मचारी, प्रवाशांच्या समस्या याबाबत ते माहिती घेत आहेत.
ते म्हणाले, एसटी स्थानक आणि शौचालयांची स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे. लाखो प्रवाशांसाठी एसटी महामंडळ काम करत आहे. त्यामुळे या स्वच्छतेला महत्त्व देणे गरजेचे आहे. याकरिता सर्व आगार व्यवस्थापकांना एसटी स्थानक परिसर व शौचालयांच्या स्वच्छतेचा फोटो दररोज व्हॉटसअप ग्रुपवर पाठवण्याचे आदेश दिले आहेत. त्याची अंलबजावणी सुरू आहे. यामुळे दररोज आगार व्यवस्थापक किमान तीन वेळा पाहणी करत असून स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे.
----
स्वच्छता अभियान
महामंडळातर्फे महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत सर्व बसस्थानकांची पाहणी करण्यात येते. परजिल्ह्यांतील एसटी अधिकारी पथक घेऊन येतात व ते पाहणी करून गुणांकन केले जाते. त्यानुसार काटेकोर स्वच्छता ठेवून रत्नागिरी जिल्ह्यातील बसस्थानकांनाही पारितोषिक मिळण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे श्री. जानराव यांनी सांगितले.
-----
कोट
उन्हाळी सुटी जादा फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. यातील बहुसंख्य फेऱ्या ऑनलाइन आरक्षणामध्ये पाहायला मिळतील. तसेच एसटी बसस्थानक आणि अधिकृत तिकीट विक्रेत्यांकडे तिकीट विक्री सुरू आहे. प्रवाशांनी जास्तीत जास्त एसटी सेवेचा लाभ घ्यावा आणि सुरक्षित प्रवास करावा.
---अश्वजित जानराव, विभाग नियंत्रक, रत्नागिरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP Train Accident : एक्सप्रेसमध्ये आगीची अफवा पसरताच प्रवाशांच्या रुळावर उड्या, दुसऱ्या ट्रेनने अनेकांना चिरडले; ५ जणांचा जागीच मृत्यू

T20 WC, IND W vs PAK W, Playing XI: हरमनप्रीत कौरने टॉसही जिंकला, पण पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन केलं की नाही?

US Iran Deal: अमेरिका-इराण कराराचा मोठा मसुदा तयार! होर्मुज स्ट्रेट खुले होणार; तेलबंदी हटणार, डीलमध्ये काय ठरलं?

Latest Live Updates Marathi: तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांनी आज दिल्लीत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली

Waste Management: उरुळी कांचनमध्ये अत्याधुनिक घनकचरा प्रकल्पाला गती; देवस्थानकडून दोन एकर जागा

SCROLL FOR NEXT