39409
शिरगाव येथे पोषण पखवड्याची सांगता
सिंधुदुर्गनगरी : सुदृढ बालक आणि निरोगी समाज घडविण्यासाठी संतुलित आहार अत्यंत आवश्यक असून कुपोषण निर्मूलनासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद महिला व बालविकास समितीच्या सभापती अनुराधा नारकर यांनी केले.
जिल्हास्तरीय पोषण पखवड्याच्या सांगता समारंभात त्या बोलत होत्या. शिरगाव येथे मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी हा समारंभ पार पडला. यावेळी देवदत्त कदम, शितल तावडे, सरपंच समीर शिरगांवकर, प्रतिक उगारे, अधिकारी शिणगारे, कौमुदी पराडकर, गौरव एखंडे, पूजा सावंत, अंकिता लोखंडे उपस्थित होते. पोषण जनजागृतीसाठी आयोजित या कार्यक्रमात अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालक व बालकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. स्त्री भ्रूणहत्येसारख्या ज्वलंत विषयावर सादर केलेली नाटिका कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरली. शिरगाव बीटच्या वतीने सादर झालेल्या या नाटिकेचे लेखन पूजा सावंत यांनी केले असून दिग्दर्शन डॉ. राजेंद्र चव्हाण यांनी केले. विनायक धुरी यांनी सूत्रसंचालन केले तर कौमुदी पराडकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.