कोकण

मोबाईलच्या युगात वाचनाची सवय टिकवणे काळाची गरज

CD

swt2421.jpg
39410
बांदा : नट वाचनालयात आयोजित जागतिक पुस्तक दिन कार्यक्रमात उपस्थित असलेले मान्यवर.

मोबाईलच्या युगात वाचनाची
सवय टिकवणे काळाची गरज
अनंत भाटे : बांदा नट वाचनालयात पुस्तक दिन साजरा
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २४ : पुस्तक हे माणसाचे खरे मित्र असून ज्ञान, संस्कार आणि विचारांची श्रीमंती देणारे अमूल्य साधन आहे. मोबाईलच्या युगात वाचनाची सवय टिकवणे ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने दररोज काही वेळ पुस्तकांसाठी राखून ठेवला, तर समाज अधिक सुसंस्कृत आणि प्रगल्भ बनेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ वक्ते अनंत भाटे यांनी येथे केले.
बांदा नट वाचनालयात जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वाचन संस्कृती जपण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी संचालक प्रकाश पाणदरे यांनी पुस्तकांचे महत्त्व, वाचनाची आवड आणि नव्या पिढीने ग्रंथांशी मैत्री करावी यावर मार्गदर्शन केले. अनंत भाटे यांनी आपल्या भाषणातून वाचनालयांची समाजातील भूमिका अधोरेखित करताना, ग्रामीण भागात वाचन चळवळ अधिक बळकट करण्याची गरज व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकांबरोबरच चरित्र, विज्ञान, इतिहास आणि साहित्याची पुस्तके वाचावीत, असे आवाहनही त्यांनी केले. नीलेश मोरजकर, हेमंत मोर्ये, स्वप्नीता सावंत, सुस्मिता नाईक, अमिता परब, प्रवीण परब आदी उपस्थित होते. राकेश केसरकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: TMC नेता BJP मध्ये सामील व्हायला आला; पण भाजप कार्यकर्ता संतापला, चेहऱ्याला हिरवा रंग फासून बाहेर काढलं

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 2 दिवसांतच भावात मोठा बदल; मुंबई-पुणेसह महाराष्ट्रात आजचा दर किती?

ENG W vs SL W : रेकॉर्ड ब्रेकिंग मॅच! इंग्लंडचा दणदणीत विजय अन् श्रीलंकेविरुद्ध विक्रमांचा पाऊस; टीम इंडियाचाही विक्रम मोडला

Sex Determination Racket: गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश! पुण्यातून सहावे सोनोग्राफी मशीन जप्त; डॉक्टर, एजंट आणि गर्भपात केंद्रे पोलिसांच्या रडारवर

Nashik Rainfall : पावसाचे दिवस 40 ते 45 वर घसरले; बदलत्या पॅटर्नमुळे शेती अस्थिर, पीकवाढीचे चक्रच कोलमडले, 2019-2015 ची आकडेवारी काय सांगते?

SCROLL FOR NEXT