कोकण

सावंतवाडीत सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी

CD

swt2423.jpg
39431
सावंतवाडी : नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्‍ताधारी व विरोधी नगरसेवकांमध्ये ठराव घेण्यावरुन खडाजंगी उडाली.

सावंतवाडीत सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी
पालिका सभा : जागा हस्‍तांतरण विषयावरुन गटनेते खेमराज कुडतरकर आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २४ : शहरातील सुवर्ण कॉलनी येथील जागा हस्‍तांतरण करण्याच्या विषयावरुन नगरपालिकेच्या सभेत गटनेते खेमराज कुडतरकर व सत्‍ताधारी नगरसेवक यांच्यात एकच खडाजंगी उडाली. मागील दोन सभेंमध्ये मागणी करुनही यावर निर्णय होत नाही याचा अर्थ आमची कामे जाणून-बुजून केली जात नाही का असा आरोप करत जोपर्यंत यावर निर्णय होत नाही, तोपर्यंत सभा सुरु करू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा कुडतरकर यांनी घेतला. अखेर नगराध्यक्षा श्रध्दाराजे भोसले यांनी हस्‍तक्षेप करत आपण याबाबत लेखी द्या, लवकर निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले आणि सभागृहाचे काम पुढे सुरू केले.
येथील पालिकेची सर्वसाधारण सभा आज नगराध्यक्षा श्रध्दा सावंत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात झाली. यावेळी उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर, मुख्याधिकारी विनायक औंधकर उपस्‍थित होते. सभेच्या सुरुवातीलाच विषयांचे वाचन सुरु असताना प्रशासनाला मध्येच थांबवत गटनेते कुडतरकर यांनी आक्रमक पवित्रा घेत म्हणाले, मागील दोन सभेत आपण ठराव मांडल्‍याप्रमाणे माझ्या प्रभागातील सुवर्ण कॉलनी येथील सभागृहासाठी, उद्यान व सुशोभिकरण करण्याकरीता ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, या जागेचे मालक हयात नसल्‍याने  जागेची  हस्‍तांतरण प्रक्रिया रखडली आहे, त्‍याचे काय झाले ? नगरपालिकेत प्रशासक असणाऱ्या तत्‍कालीन प्रांताधिकारी यांनी निधी मंजूर असून देखील हा प्रस्‍ताव फेटाळला होता, असे सांगत हा मुद्दा उचलून धरला. त्‍यावर नगराध्यक्षा यांनी आपण लेखी पत्र द्या, त्‍यावर निर्णय घेऊ  असे सांगितले.
दरम्‍यान मागील सलग दोन सर्वसाधारण सभेत मी ठराव मांडला आहे. पत्र देण्याची गरज वाटत नाही. यावर तातडीने ठराव घ्‍या, अन्यथा सभा सुरु करु देणार नाही, असा पवित्रा घेतला. त्‍यात नगरसेविका निता कविटकर यांनी उडी घेत हा विषय मागील दोन बैठकांपसून सुरु आहे. त्‍यावर याच बैठकीत निर्णय झाला पाहिजे, त्‍यावेळी तत्‍कालीन नगराध्यक्ष कोण तरी होते त्‍यांनी कोणताही निर्णय घेतला नाही, असे सांगताच सत्‍ताधारी नगरसेवक खवळले. कोण तरी या शब्‍दाला आक्षेप घेत नगरसेवक सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, निलम नाईक, सिध्दार्थ भांबुरे, प्रतीक बांदेकर विरोधकांवर तुटून पडले. त्‍यांनी गदारोळ करत  कोणतरी म्‍हणजे कोण ? ते पदसिध्द उपनगराध्यक्ष आहेत, त्‍यांच्या पदाचा मान ठेवा, असे खडेबोल सुनावले. नगरसेवक आनंद नेवगी यांनी उभे राहत विरोधी नगरसेविका निता कविटकर यांना त्‍यांचे नाव घ्‍या, असे सांगितले. त्‍यावर नगराध्यक्षा यांनी आपण इथे विकासाची चर्चा करायला आलो आहोत, वाद घालायला नाही. त्‍यामुळे सर्वांचा आदर करुन बोला, असे निर्देश दिले.

चौकट
१५ मेपूर्वी रस्त्यांवरील डांबरीकरण पूर्ण
सावंतवाडी शहरात गॅस, नळपाणी पाईपलाईनसाठी रस्‍ते खोदाई केली आहे. काही ठिकाणी कामे पूर्ण झाली तरी अद्याप तेथील डांबरीकरण झालेले नाही. ही कामे कधी करणार? असा सवाल गटनेते कुडतरकर यांनी केला. त्‍यावर डांबरीकरणाच्या कामांना सुरुवात झाली आहे, १५ मेपूर्वी संपूर्ण शहरातील डांबरीकरण पूर्ण केले जातील, असे आश्वासन नगराध्यक्षा भोसले यांनी दिले. शहरात सुरु असलेले फुटपाथचे काम प्रशासनाला कल्‍पना न देताच सुरु असल्‍याने यावर नगरसेवक तौकीर शेख यांनी आक्षेप घेतला. या कामाची कल्‍पना मुख्याधिकारी यांना तरी आहे का असा सवाल सभेत केला.

चौकट
मोबईल टॉवर्स कराची ८ लाख थकबाकी
शहराच्या हद्दीतील मोबाईल टॉवर्स कर आकारणीपोटी ८ लाख ४८ हजार ४३ रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये मागील व चालू कराची आकारणी असून ती तातडीने वसूल केली जावी, अन्यथा नगरपालिकेचे नुकसान होईल, असे नगरसेवक प्रतीक बांदेकर यांनी सांगितले. यावर शासनाकडून अहवाल मागवण्याबाबत ठराव घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AAP मध्ये बंडखोरीचा भडका! पक्ष आणि अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया समोर; ७ खासदारांचे नाव घेत भाजपवर गंभीर आरोप

"ऐ, पार्टनर, आज सेलिब्रेशन तो बनता है!" विनोद कांबळी शिवाजी पार्क मैदानावर पोहोचला, सचिन तेंडुलकरच्या वाढदिवशी दिलं सरप्राईज Video

Pali News : रिलायन्सच्या सुरक्षा अधिकाऱ्याची मुजोरी; अपघाताचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराचा मोबाईल हिसकावला

Latest Marathi News Live : 7 खासदारांनी तडकाफडकी पक्ष सोडल्यानंतर आम आदमी पार्टीची पहिली प्रतिक्रिया

Hardik Pandya: "जा, जाऊन झोप; घरी पोहोचल्यावर कॉल कर!" मुंबई इंडियन्स हरली अन् कॅप्टन पांड्याचं भलतंच काहीतरी चाललंय...

SCROLL FOR NEXT