-rat२४p१५.jpg-
P26O39422
रत्नागिरी : कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात बियाणी पेरणी कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. दिलीप नागवेकर.
-----------
आगाशे विद्यामंदिरात बियांची पेरणी
रत्नागिरी : कृ. चिं. आगाशे प्राथमिक विद्यामंदिराच्या आवारात विविध प्रकारच्या बियांची पेरणी करण्यात आली. शाळेच्या माजी विद्यार्थी संघाच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला. या वेळी भाट्ये नारळ संशोधन केंद्राचे माजी केंद्रप्रमुख डॉ. दिलीप नागवेकर हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला शाळा समितीचे सदस्य चंद्रकांत घवाळी, प्रबंधक विनायक हातखंबकर, माजी विद्यार्थी संघाचे संजय शिवलकर, दीपक आंबुलकर, मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम, सुधीर शिंदे, शुभांगी अनुसे हे शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. नागवेकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते बी पेरून झाली. त्यावेळी श्री. नागवेकर यांनी अक्षय्य तृतीयेला पेरणी का करतात हे सांगून मुहूर्त शेतीचे महत्त्व सांगितले. शाळेतील परसबाग, त्याची काळजी कशी घ्यावी, कोणत्या बियाणांची निवड करावी याबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करून त्यांचा उत्साह वाढवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.