कोकण

संक्षिप्त-१

CD

swt2426.jpg
39456
रामगड किल्ला

रामगड किल्ल्यावर
दिपोत्सव, मशाल फेरी
आचरा : दुर्गवीर प्रतिष्ठान आणि रामगड ग्रामस्थ यांच्यावतीने १ मे रोजी महाराष्ट्र दिनी किल्ले रामगडावर मशाल महोत्सव आणि दीपोत्सवाचे आयोजन केले. सायंकाळी साडेपाच वाजता गडपूजन, गणेश पूजन, शिवपूजन, महाआरती, सायंकाळी साडेसहा वाजता दीपोत्सव, सात वाजता मशाल फेरी आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहून प्रेरणा द्यावी, असे आवाहन दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
-------


वेंगुर्ले शाळेच्या
माजी विद्यार्थ्यांची सभा
वेंगुर्ले ः वेंगुर्ले शाळा नं. १ (तालुका स्कूल) च्या माजी विद्यार्थ्यांची सभा २९ एप्रिलला सकाळी १० वा. शाळेच्या विठाई सभागृहात आयोजित केली आहे. या सभेत माजी विद्यार्थी संघ अद्ययावत करणे, शाळेच्या भौतिक विकासाच्यादृष्टीने विचारविनिमय करणे, तसेच शाळेने विविध स्तरावर मिळविलेल्या यशाचा आढावा घेण्यात येणार आहे. जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहवे, असे आवाहन मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर. आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर यांनी केले आहे.
................................

कणकवलीत मेमध्ये
राष्ट्रीय लोकअदालत
कणकवलीः महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि उच्च न्यायालय, मुंबई व सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांच्या निर्देशानुसार येथील दिवाणी न्यायालयात ९ मेस सकाळी १०.३० वा. राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. प्रलंबित दिवाणी व फौजदारीकडील प्रकरणे तसेच राष्ट्रीयकृत बॅक, सहकारी बॅक, स्वायत्त संस्था, ग्रामपंचायतीकडील वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवायची आहेत, त्यांनी तालुका विधी सेवा समिती, कणकवलीकडे दाखल करावीत. चर्चेद्वारे मिटवायची असतीलत्यांनी वादपूर्व चर्चेसाठी या न्यायालयात उपस्थित राहवे, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश, तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एस. जी.
लटुरिया यांनी केले आहे.
..............................

IPL 2026 : क्रिकेटच्या मैदानावर मोठी दुर्घटना, युवा खेळाडूला गंभीर दुखापत, रक्तबंबाळ अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले... Video

Alliance Air Plane Service : जळगावकरांना आता ‘दिल्ली दूर नही’; चार तासांत दिल्ली तर ४0 मिनिटांत इंदूर गाठता येणार

पावसाळ्यात २४ दिवस मोठे उधाण, १४५ गावांना धोका; प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा

Indapur News : इंदापूरमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा संवाद मेळावा; मराठा समाज संघटन आणि आंदोलनाचा इशारा

RCB vs GT Live: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सामन्यापूर्वी धक्का, स्टार फलंदाज जखमी! गुजरात टायटन्सकडून ऑल राऊंडरचे पदार्पण

SCROLL FOR NEXT