कोकण

वेर्लेला वादळी पावसाचा तडाखा

CD

swt2414.jpg
39402
माजगाव : नाईकवाडा येथील धनश्री गावकर यांच्या घरावर पडलेले आंब्याचे झाड.
swt2416.jpg
39404
देवसु : येथील मंगेश धोंडी परब यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले.
swt2417.jpg
O39405
वेर्ले : देऊळवाडी येथील सुरेश नाईक यांच्या घराचे झालेले नुकसान.


वेर्लेला वादळी पावसाचा तडाखा
सावंतवाडी तालुक्यात मुसळधार; सुमारे २६ लाखांची हानी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २४ : तालुक्यात झालेल्या वादळी पावसाचा तडाखा वेर्ले, देवसू आणि माजगाव गावाला बसला. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत केले. या अतिवृष्टी आणि वादळामुळे अनेक घरे आणि मांगरांचे मोठे नुकसान झाले. सावंतवाडी तालुक्यात अंदाजे तब्बल २५ लाख ९० हजार रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली. सुदैवाने यात जीवीतहानी झाली नाही.
वेर्ले गावात वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले आहे. वेर्ले-देऊळवाडी येथील रहिवासी सुरेश आत्माराम नाईक यांच्या राहत्या घराच्या छताचे अतिवृष्टी आणि वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान झाले. या आपत्तीत त्यांचे सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. वेर्ले-फौजदारवाडी येथील अर्जुन रामा सावंत यांच्या मांगराचेही छप्पर वादळी वाऱ्याने उडून गेल्याने नुकसान झाले. या नुकसानीची अंदाजे रक्कम २० हजार रुपये आहे. ऐन पावसाच्या सुरुवातीलाच छताचे नुकसान झाल्याने या कुटुंबासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
देवसु परिसरातही चक्रीवादळाचा तडाखा बसला. येथील मंगेश धोंडी परब यांच्या राहत्या घरावर मोठे झाड उन्मळून पडल्याने घराचे नुकसान झाले आहे. या घटनेत अंदाजे ५,६०० रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शिरशिंगे परिसरातही ढगांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. पावसामुळे परिसरातील तापमानात घट झाली असली तरी, वादळी वाऱ्याने शेतकरी आणि ग्रामस्थांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
या सर्व नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले आहे. माजगाव येथे धनश्री गावकर यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळल्याने घराचे प्रचंड नुकसान झाले. कलंबिस्त व शिरशिंगे या भागात मुसळधार पावसासह सोसाट्याचा वारा वाहिल्याने अनेक घरांची पडझड झाली आहे. आंबोली परिसरात गुरुवारी सायंकाळपासूनच विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली होती.

चौकट
असे झाले नुकसान
शहरात जवळपास २५ ठिकाणी झाडे पडणे, महावितरण पोल वाकण्यासह ४ घरांवर झाड पडून नुकसान झाले. पत्र्याची शेड उडून गेल्याने मोठी हानी झाली. यात शहरातील ज्योती मुद्राळे यांचे अंदाजे १८ हजार, दीपक गावडे २२ हजार, प्रशांत गोसावी १९ हजार, चेतन गुप्ता २० हजार, स्नेहा सबनीस ५० हजार, वैभव सावंत यांची पत्र्याची शेड उडून गेल्याने ११ ला ७५ हाजर तर शेजारील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे १२ लाख ६६ हजार तर गौरी परब यांचे २० हजार रूपयांचे मिळून अंदाजे २५ लाख ९० हजारांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती तहसीलदारांनी दिली आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मदतीच्या अपेक्षेत नागरिक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT