कोकण

कन्यादान साहित्य, आजारी मुलांना मदत मिळणार

CD

कन्यादान साहित्य, आजारी मुलांना मदत मिळणार

योजना प्रस्तावित; अहिल्यादेवी होळकर पुरस्कारही देणार

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २५ : दारिद्र्यरेषेखालील व अल्प उत्पन्न गटातील कुटुंबातील मुलींसाठी कन्यादान साहित्य देणे, दुर्धर आजाराने पीडित मुलांना आर्थिक मदत करणे तसेच ग्रामपातळीवर कार्य करणाऱ्या होतकरू महिलांना ‘अहिल्यादेवी होळकर’ पुरस्काराने सन्मानित करण्याची महत्त्वपूर्ण योजना महिला व बाल विकास समितीच्या सभेत प्रस्तावित करण्यात आली. या प्रस्तावाला सभेत मान्यता दिली असून अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद महिला व बाल विकास समितीची सभा सभापती अनुराधा नारकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रतीक उगारे, सदस्य मिलिंद नाईक, सुप्रिया मेस्त्री, अवनी तेली, आरती पाटील, हर्षदा वाळके, क्षमा हडकर आदी उपस्थित होते.
सभेत महिलांच्या सक्षमीकरणास चालना देणाऱ्या आणि गरजू कुटुंबांना दिलासा देणाऱ्या योजनांवर विशेष भर देण्यात आला. प्रस्तावित योजनेनुसार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींच्या विवाहावेळी कन्यादानासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच दुर्धर आजाराने पीडित मुलांना एकूण ५० हजारांची मदत देण्याचा निर्णय घेतला असून, प्राथमिक उपचारासाठी १५ हजार व शस्त्रक्रियेसाठी ३५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. गावपातळीवर महिलांच्या उन्नतीसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा ‘अहिल्यादेवी होळकर’ पुरस्काराने सन्मान करण्याचीही योजना राबविण्यात येणार आहे.
------------
जिल्ह्यात सेविका, मदतनीस पदे रिक्त
अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांचा आढावा घेतला असता जिल्ह्यातील १५३९ अंगणवाडया पैकी १५२७ सेविका कार्यरत असून १२ पदे रिक्त असल्याचे समोर आले. मदतनीसांच्या बाबतीत १५३९ पैकी १४७८ पदे भरलेली असून ६१ पदे रिक्त आहेत. तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका पदांची १६ जागा रिक्त असल्याची माहिती सभेत देण्यात आली.
------
८ पैकी ५ सीडीपीओ पदे रिक्त
तालुकास्तरावरील महिला व बाल विकास विभागाचा कारभार सांभाळणाऱ्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या ८ मंजूर पदांपैकी केवळ ३ पदे भरली असून तब्बल ५ पदे रिक्त असल्याचे उघड झाले. सध्या या पदांचा अतिरिक्त कार्यभार इतर कर्मचाऱ्यांकडे देऊन कामकाज सुरू असल्याची बाबही सभेत समोर आली. याबाबत सभापती नारकर यांनी रिक्त पदांचा अहवाल शासनाला सादर करावा, अशी सूचना केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, DC vs PBSK: दिल्लीने उभारल्या IPL 2026 मधील सर्वोच्च धावा! केएल राहुलचं वादळी दीडशतक अन् नितीश राणासोबत विक्रमी पार्टनरशीप

Mumbai News: मुंबईत २७ वर्षांनंतर सूडाची थरारक कहाणी! दया नायकांकडून काकाचा एनकाउंटर; बदल्यातून पुतण्याने खबऱ्याला क्रूरपणे संपवलं

Solapur Crime News: ९० हजारांच्या बनावट लुटीचा पर्दाफाश; फिर्यादीच निघाला द्राक्ष खरेदीच्या रकमेचा चोर

Solar Power Extra Charges: स्व-उपभोग सौर विजेवर अतिरिक्त शुल्काचा प्रस्ताव; ग्राहक पंचायतीचा तीव्र विरोध, राज्यभर जनजागृती व आंदोलनाची चेतावणी

Pachod News : दुधाच्या हव्यासापोटी ऑक्सिटोसिन इंजेक्शनांचा ग्रामिण भागात सर्रास वापर

SCROLL FOR NEXT