कोकण

हिंदळेत पुस्तक प्रदर्शनास प्रतिसाद

CD

39606

हिंदळेत पुस्तक प्रदर्शनास प्रतिसाद
नांदगाव, ता. २६ ः जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून हिंदळे ग्रामोन्नती मंडळ वाचनालय, हिंदळे येथे आयोजित पुस्तक प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शासकीय अनुदान २०२५-२६ मधून खरेदी केलेली पुस्तके प्रदर्शनात मांडण्यात आली होती. प्रदर्शनाचे उदघाट्न हिंदळे भंडारवाडा शाळा मुख्याध्यापिका भक्ती चव्हाण यानी केले. यावेळी अंगणवाडी सेविका वैशाली तेली आणि विद्यार्थी उपस्थित होते. प्रदर्शनात कथा, कादंबरी, चरित्र, नाट्य, धार्मिक, प्रवास वर्णन, इतिहास ग्रंथ, शिशू कथा आदी पुस्तके मांडण्यात आली होती. ग्रंथपाल मिताली हिर्लेकर यांनी पुस्तकांचे जीवनातील महत्त्व विशद केले. ग्रंथ हेच आपले खरे गुरू आणि मार्गदर्शक आहेत. वाचनामुळे विचारांना नवी दिशा मिळते, असे त्यांनी सांगितले. सिद्धकला भजन मंडळाच्या सदस्यांनी प्रदर्शनास भेट दिली. वाचनालय संचालक मंडळाचे विशेष सहकार्य लाभले. जिल्हा परिषद सदस्य सुनील पारकर, सरपंच मकरंद शिंदे आदी उपस्थित होते. बाल वाड:मयाचे उदघाट्न ध्रुवी हिर्लेकर हिने केले. वाचनालयाच्या या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, RR vs SRH: सनरायझर्स हैदराबादने अचनाक कर्णधार बदलला! नवा कॅप्टन टॉस जिंकून ईशान किशनबद्दल काय म्हणाला?

Police Recruitment : जुन्नरच्या अतिदुर्गम देवळे गावातील शेतकरी कुटुंबातील वैशाली शेळकेची पिंपरी-चिंचवड पोलिस दलात निवड

Pune Crime : अंमली पदार्थ विक्रीतील रेकॉर्डवरील आरोपी शेरखान पठाण दोन वर्षांसाठी पुणे शहर, ग्रामीण व पिंपरी-चिंचवड हद्दीतून तडीपार

Education Success: श्री मुक्तादेवी विद्यालयाच्या साक्षी उंडे व अनुष्का भारमळ यांचा एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकदार यश

Pune School Award: जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कूलचा शैक्षणिक क्षेत्रात गौरव, पुणे जिल्हा परिषदेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण मोहिमेत मानाचा बहुमान

SCROLL FOR NEXT