कोकण

म्हापण येथे उद्यापासून बुद्ध जयंती

CD

39599
भगवान गौतम बुद्ध

म्हापण येथे उद्यापासून बुद्ध जयंती
म्हापण, ता. २५ ः गौतम बुद्ध जयंती महोत्सव आणि म्हापण (ता. वेंगुर्ले) येथील नालंदा बुद्धविहाराचा १९ वा वर्धापन दिन सोहळा २७ एप्रिल ते १ मे या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (गाव शाखा म्हापण) आणि पंचशील महिला मंडळ (म्हापण) यांच्या संयुक्त विद्यमाने नालंदा बुद्धविहार येथे या महोत्सवाचे आयोजन केले आहे. सोमवारी (ता. २७) सकाळी ९ वाजता धम्म ध्वजवंदनाने महोत्सवाची सुरुवात होईल. रोज सकाळी ६ वाजता व सायंकाळी ७ वाजता पूजापाठ, धम्म प्रवचन होणार आहे. सोमवारी (ता. २७) सायंकाळी ७ वाजता पूजा सूत्रपठण व धम्मप्रवचन, रात्री ९ वाजता पंचशील गायन पार्टी, सावंतवाडी यांचा भीम गीतांचा कार्यक्रम. मंगळवारी (ता. २८) सायंकाळी ४ वाजता रंगभरण स्पर्धा व महिलांचे विविध फनी गेम, रात्री ९ वाजता भारतीय बौद्ध महासभा, गावशाखा बाव यांचा भीम गीतांचा कार्यक्रम (पुरस्कर्ते-संतोष म्हापणकर). बुधवारी (ता. २९) सायंकाळी ४ वाजता मुलांचे विविध फनी गेम, रात्री ९ वाजता ‘सन्मान कुटुंबाचा’ सोहळा, १० वाजता युगनायक सांस्कृतिक कलापथक सिंधुदुर्ग निर्मित ‘कुकारो’ ही एकांकिका (पुरस्कर्ते-संजय म्हापणकर). गुरुवारी (ता. ३०) सायंकाळी ४ वाजता विविध फनी गेम, रात्री ९ वाजता पाट ग्रामस्थ युवक मंडळ, पाट निर्मित दोन अंकी नाट्यप्रयोग ‘ग बाई... बाई नको’ (पुरस्कर्ते-चंद्रकांत म्हापणकर). शुक्रवारी (ता. १) दुपारी १ वाजता स्नेहभोजन, रात्री ९ वाजता ज्ञानगंगा ग्रुप, म्हापण निर्मित ‘व्हायरायटी शो’, १० वाजता सत्यशोधक शाहिरी जलसा, सिंधुदुर्ग यांचा प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: 16 चौकार, 9 षटकार... KL Rahulचे दीडशतक! १९ वर्षात कोणत्याच भारतीयाला न जमकलेला पराक्रम, Orange Cap ही मिळवली

Junnar Association: जुन्नर शिवनेर खते-बियाणे औषध विक्रेते असोसिएशन अध्यक्षपदी प्रवेश देवकर यांची बिनविरोध निवड

Gautam Adani: गौतम अदानींच्या संपत्तीत जबरदस्त उसळी! 100 अब्ज डॉलर क्लबमध्ये एन्ट्री; 'या' उद्योगपतीला दिली टक्कर

IPL 2026, RR vs SRH: सनरायझर्स हैदराबादने अचानक कर्णधार बदलला! नवा कॅप्टन टॉस जिंकून ईशान किशनबद्दल काय म्हणाला?

Police Recruitment : जुन्नरच्या अतिदुर्गम देवळे गावातील शेतकरी कुटुंबातील वैशाली शेळकेची पिंपरी-चिंचवड पोलिस दलात निवड

SCROLL FOR NEXT