39600
श्रीकृष्ण तळवडेकर यांचा सत्कार
मालवण : मालवण तालुका शासकीय, निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था लिमिटेड संचलित मालवणी बझारच्या अध्यक्षपदी संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्रीकृष्ण तळवडेकर यांची एकमताने निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी अजय हिर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रियेची सभा पार पडली. संस्थेच्या ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी मालवण शहरातील संस्थेची मालकीची असलेली ८ हजार चौरस फूट प्रशस्त जागा जमिनीत बहुउद्देशीय विकासात्मक डेव्हलपमेंट करून संस्थेला आर्थिक स्थिरतेकडे नेऊन प्रगती करण्यात येणार असल्याचे श्री. तळवडेकर यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद परब यांनी शुभेच्छा देऊन कर्मचाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल, असे सांगितले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अजय हिर्लेकर, उपाध्यक्ष मारुती सोनवडेकर, संचालक प्रमोद मोहिते, प्रताप बागवे, सूरज गवंडी, विनोद सातार्डेकर, मंगेश परब, हनुमंत प्रभू, प्रशांत पारकर, विठ्ठल मालंडकर, रुपेश खोबरेकर, हेमंत तळवडेकर, सुप्रिया गावकर, जयश्री हडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद परब उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.