कोकण

मालवणात हिवताप निर्मूलन जागृती

CD

39601

मालवणात हिवताप निर्मूलन जागृती
मालवण : येथील ग्रामीण रुग्णालयात आज ‘जागतिक हिवताप दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित कर्मचारी आणि नागरिकांना राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. तसेच आरोग्य विषयक महत्त्वाचे मार्गदर्शनही करण्यात आले. याप्रसंगी रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. डी. पोळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमित मोडक, डॉ. मेहेंदळे, आरोग्य निरीक्षक व्ही. पी. सावंत, आरोग्यसेवक एस. ए. चांदेरकर, श्रीमती प्रभू, श्रीमती वेंगुर्लेकर, श्रीमती कुबल, संतोषी देसाई, श्री. केळुसकर उपस्थित होते. या उपक्रमाद्वारे परिसरात हिवताप निर्मूलनासाठी जनजागृती करण्यात आली.
....................
39602

मिलिंद जाधवांना आज ‘समाजभूषण’
मालवण : सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोल्हापूर येथील आविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशनच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले समाजभूषण पुरस्कार येथील फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे संस्थापक अध्यक्ष आणि सेवानिवृत्त गटविकास अधिकारी मिलिंद जाधव यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार उद्या (ता. २६) सकाळी ११ वाजता हॉटेल जानकी, कुंभारमाठ येथे प्रदान करण्यात येणार आहे. श्री. जाधव यांनी फुले शाहू आंबेडकर चळवळीत दिलेले योगदान आणि प्रशासकीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना जाहीर केल्याची माहिती या फाउंडेशनचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष आणि पत्रकार संजय पवार यांनी दिली. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT