कोकण

सर्व्हर डाउनमुळे ऑनलाइन सात-बारा सेवा ठप्प

CD

डिजिटल सेवा ठप्प, शेतकरी त्रस्त
कागदपत्रांसह, कर्ज मिळण्यात अडचणी; खरीपपूर्व तयारीवर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : पोर्टल अपग्रेडेशनच्या नावाखाली ३० एप्रिलपासून संकेतस्थळ बंद असल्यामुळे सात-बारा, आठ अ, फेरफार नोंदी व म्युटेशन संबंधित सर्व सेवा ठप्प असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. ‘सर्व्हर डाऊन’ व ‘एरर’ च्या सातत्याने असलेल्या समस्यांमुळे ऑनलाइन सेवा कोलमडली आहे. खरीप हंगामापूर्वी शेतकरी सात-बारा, आठ अ फेरफार यासंबंधी कागदपत्रे गोळा करून ठेवतात. मात्र, सात-बारा व अन्य कागदपत्रे मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय झाली आहे.
जिल्ह्यात भात पिकासाठी कर्ज घेणारे शेतकरी मोजकेच आहेत. मात्र, आंबा काजूसाठी पीक कर्ज घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. जून/जुलै महिन्यात नवीन पीक कर्ज घेण्यासाठी सातबारा, आठ अ, फेरफार या कागदपत्रांची आवश्यकता भासते, मात्र संकेतस्थळच बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. अधिकृत संकेतस्थळ अपग्रेडेशनसाठी बंद करण्यात आले आहे. मात्र, नियोजित वेळेपेक्षा अधिक कालावधी उलटूनही सेवा सुरू न झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पोर्टल दुरुस्तीबाबत प्रशासनाकडून कोणतीही मुदत जाहीर केलेली नाही. सातबारा उतारा, आठ अ उतारा, फेरफार नोंदी, म्युटेशन प्रक्रिया व इतर जमीन अभिलेख संबंधित सेवा बंद आहेत. कागदपत्रासाठी शेतकरी सेतू व महा-ई-सेवा केंद्राला भेट देत आहेत.
जमीन खरेदी विक्री, फेरफार नोंदी मिळत नसल्याने जमिनीचे व्यवहार रखडले आहेत. भूमी अभिलेख विभागाच्या महाभूमी पोर्टलवर अपग्रेडेशन व देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली सेवा ठप्प आहे. जिल्ह्यात जमिनीचे व्यवहार थांबले असून, शेतकऱ्यांनाही वेळेवर कागदपत्रे न मिळाल्यास गैरसोय होणार आहे. जूनमध्ये पीक कर्जाची परतफेड करून नवीन कर्ज मंजुरीसाठी डिजिटल सात-बाराची आवश्यकता आहे. तत्पूर्वी संकेतस्थळ सुरू होणे आवश्यक आहे. खरीप हंगामासाठी लागणारे बियाणे, खते खरेदीसाठी सात-बाराची आवश्यकता भासते, मात्र पोर्टलच बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची समस्या वाढली आहे.
---
सेतू, ई-सेवा केंद्रांचे हेलपाटे
पोर्टल अपग्रेडेशनमुळे संकेतस्थळ बंद असल्यामुळे शेतकरी सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्रावर रांगा लावत आहेत. मात्र, तांत्रिक समस्येमुळे शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: पुण्यात भयंकर प्रकार! मद्यपीने बस हायजॅक करुन विरुद्ध दिशेने पळवली; रहदारीच्या रस्त्यावर थरार

फॅशन आणि परफॉर्मन्सचा परफेक्ट कॉम्बो... Fascino 125 ला मिळाला प्रीमियम आणि स्टायलिश टच; नवी डिझाइन आणि किंम्मत काय?

Latest Marathi News Live Update: ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत अंधेरीत मोठी कारवाई

Pune Fraud News : सराफाला १८ कोटींचा गंडा घालणाऱ्या कामगारासह तीन साथीदारांना अटक; सव्‍वापाच कोटींचा मुद्देमाल जप्त

PMC QR Code Hoardings: पुण्यात आता होर्डिंगसाठी क्युआर कोड बंधनकारक! महापालिकेचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT