कोकण

चुलीच्या धुरातून दिल्लीपर्यंत झेप

CD

-rat२५p२.jpg-
26O39627
लांजा ः मठ येथे जिद्दीच्या जोरावर शेती, नर्सरी, हस्तकलेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रज्ञा जाधव
-rat२५p३.jpg-
26O39628
प्रज्ञा जाधव यांनी आंबा कलमांची नर्सरी
---
मठ असोडे गावातून दिल्लीपर्यंत यशाची झेप
प्रज्ञा पवारांची यशोगाथा ; शेती, नर्सरी, हस्तकलेतून शोधला उन्नतीचा मार्ग
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २५ ः लांजा तालुक्यातील मठ असोडे येथील प्रज्ञा प्रकाश पवार यांनी जिद्द, कष्ट आणि कौशल्याच्या जोरावर ग्रामीण महिलांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. शेती, नर्सरी व्यवसाय, हस्तकला आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्याचा मान थेट दिल्लीपर्यंत पोहोचवला आहे.
२०१४ मध्ये ‘उमेद’ अभियानाशी जोडलेल्या प्रज्ञा पवार यांनी २०१७ पासून ‘कृषी सखी’ म्हणून काम सुरू केले. त्यांनी महिलांना श्री पद्धतीने भातशेती, नाचणी लागवड व कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण देत आर्थिक सक्षमतेचा मार्ग दाखवला. स्वतःच्या नर्सरी व्यवसायातून वेंगुर्ला काजू, आंबा, नारळ, सुपारी, कोकम आदींची हजारो रोपे तयार करून लाखोंची उलाढाल साधली. गावातील महिलांना रोजगार देतानाच शेकडो महिलांना मोफत कलम बांधणी प्रशिक्षण दिले. हस्तकलेतही त्यांनी कापडी पिशव्या व बॅग्ज तयार करून रत्नागिरी ते मुंबई प्रदर्शनात छाप पाडली.
---
परसबाग संकल्पना घराघरांत रुजवली
प्रज्ञा पवार यांच्या कार्याची खरी पावती तेव्हा मिळाली, जेव्हा त्यांची निवड थेट राजधानी दिल्लीसाठी झाली. पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या महिला कृषी प्रतिनिधींच्या कार्यक्रमात त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलं. एका ग्रामीण भागातील महिलेने दिल्लीच्या दरबारात जिल्ह्याचा मान वाढवावा, ही बाब संपूर्ण कोकणासाठी अभिमानास्पद ठरली आहे. सध्या त्या ''राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पा''त कार्यरत असून, सेंद्रिय शेतीचा प्रसार करत आहेत. जिवामृत, बिजामृत आणि दशपर्णी अर्काचा वापर करून त्यांनी ‘परसबाग’ ही संकल्पना घराघरांत रुजवली आहे.
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: पुण्यात भयंकर प्रकार! मद्यपीने बस हायजॅक करुन विरुद्ध दिशेने पळवली; रहदारीच्या रस्त्यावर थरार

फॅशन आणि परफॉर्मन्सचा परफेक्ट कॉम्बो... Fascino 125 ला मिळाला प्रीमियम आणि स्टायलिश टच; नवी डिझाइन आणि किंम्मत काय?

Latest Marathi News Live Update: ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत अंधेरीत मोठी कारवाई

Pune Fraud News : सराफाला १८ कोटींचा गंडा घालणाऱ्या कामगारासह तीन साथीदारांना अटक; सव्‍वापाच कोटींचा मुद्देमाल जप्त

PMC QR Code Hoardings: पुण्यात आता होर्डिंगसाठी क्युआर कोड बंधनकारक! महापालिकेचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT