कोरेगाव येथे समाधान शिबिर उत्साहात
खेड ः तालुक्यातील कोरेगाव, शिर्शी, सवनस, नांदगांव, आमशेत आदी खडीपट्ट्यातील गावांसाठी कोरेगाव येथील धावजी बाबा मंदिरात तहसीलदार सुधीर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महास्वराज्य समाधान शिबिर उत्साहात झाले. शिबिराला पंचायत समिती सदस्य निसार सुर्वे, माजी सरपंच देवेंद्र मोरे प्रकाश मोरे, दाऊद दुदुके, मंडल अधिकारी राजाराम घुले आदी उपस्थित होते. तहसीलदार सोनवणे यांनी या शिबिराचा मुख्य उद्देश लोकांना समजावून सांगितला. शिबिरामध्ये निराधार पेन्शन, विधवा पेन्शन, अपंग पेन्शन, रेशनकार्डचे काम, सातबारा, वारस तपास आदी दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
करंजाणीत दहावीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान
गावतळे ः दापोली तालुक्यातील करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहावी सन्मान सोहळा उत्साहात झाला. या वेळी संस्थेच्या अध्यक्षा सरोज मेहता, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा साधना बोत्रे, भाग्यश्री फणसाळकर, प्रीती जैन, मुख्याध्यापिका रितू मेहता आदी उपस्थित होते. सन्मान सोहळ्यात मागील वर्षीच्या दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, ट्रॉफी आणि विशेष पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. ‘यशोगाथा व टॉपर मार्गदर्शन’ या कार्यक्रमात मागील बॅचमधील गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले अनुभव, अभ्यासाच्या पद्धती आणि यशस्वी होण्यासाठीचे मार्गदर्शन दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.