कोकण

-आपल्यातील क्षमतेचा शोध घ्या

CD

क्षमताशोध म्हणजेच खरे शिक्षण
अविनाश धर्माधिकारी : चिपळुणात विद्यार्थी संमेलन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ ः समाजातील प्रत्येक व्यक्तीची बुद्धीमत्ता, आवड आणि क्षमता ही वेगळी असते. आपल्यातील क्षमतेचा शोध घेऊन त्याचे प्रकटीकरण हेच हीच खरी शिक्षणाची व्याख्या आहे. आपल्याला काय येत नाही यावर विचार करण्यात आयुष्य वाया घालवण्यापेक्षा, आपल्याला काय करता येईल यावर जीवनाची इमारत उभी करावी, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडळ परिवारचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी आज चिपळूण येथे व्यक्त केले.
चतुरंग प्रतिष्ठानतर्फे आज शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात दोन दिवसीय कोकण अभ्यासवर्ग विद्यार्थी संमेलनाचे उद्‍घाटन संमेलनाध्यक्ष आणि यूजीसीचे माजी उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, पुणे येथील मांडके हिअरिंग सर्व्हिसेसच्या श्रवणतज्ज्ञ डॉ. कल्याणी मांडके, वत्ते मंदार ओक यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी ज्येष्ठ सनदी अधिकारी धर्माधिकारी बोलत होते. ते म्हणाले, शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकातील माहिती आत्मसात करणे नव्हे, तर स्वतःच्या अंतरंगात डोकावून स्वतःला ओळखणे होय. आपण कोण आहोत, आपल्यात कोणत्या क्षमता आहेत आणि आपण समाजासाठी काय करू शकतो, याची जाणीव होणे म्हणजे खरे शिक्षण आहे.
कार्यक्रमाची सुरुवात वामन कुलकर्णी यांनी सादर केलेल्या सरस्वती स्तवनाने झाली. विभाकर वाचासिद्ध यांनी अत्तरकुपी देऊन मान्यवरांचे स्वागत केले. इंद्रायणी दीक्षित यांनी चतुरंग प्रतिष्ठानच्या स्थापनेपासूनच्या कार्याचा आढावा घेतला. मंदार ओक यांनी चतुरंगच्या स्मरणिकेविषयी माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत, चतुंरगचे संस्थापक विद्याधर निमकर, पालिकेचे माजी मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: मान्सूनने महाराष्ट्र व्यापला! सर्वदूर पावसाची शक्यता; १० जिल्ह्यांत मुसळधार, तर १५ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Cow Urine for Chikungunya: चिकनगुनियावर गोमूत्र प्रभावी ठरू शकतं? IIT रुडकीच्या संशोधनात आश्चर्यकारक दावा समोर

धुमधडाक्यात पार पडलं 'कारभारी लयभारी' जोडीचं लग्न, अनुष्का-निखिलाच्या लग्नातील फोटो, व्हिडिओ पाहिलेत का?

Latest Marathi News Live Update : रायगडमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा; देहेन गावाजवळील बंधाऱ्याला भगदाड

कुणासारखा दिसतो विकी कौशल- कतरिना कैफचा मुलगा विहान? आजोबा श्याम कौशल यांनी सांगितलं गुपित, म्हणाले- त्याचा चेहरा...

SCROLL FOR NEXT