-rat२५p१६.jpg-
26O39659
देवरूख ः खास भाच्यासाठी मुंबईतून आलेला आंबा.
----------
मुंबईचा ‘आंबा’ देवरुखात
लालबागमध्ये लावले झाड; कौटुंबिक ओढ
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. २५ ः आंबा हा कोकणी माणसाच्या अस्मितेचा आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे. सहसा कोकणातून आंबा मुंबई-पुण्याकडे जातो, मात्र नुकताच मुंबईतील झाडाचा आंबा एसटीने प्रवास करत थेट देवरुखात पोहोचल्याची एक घटना समोर आली आहे.
संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे-बावनदी येथील सूर्यकांत वाजे यांच्या आईंनी वर्षांपूर्वी मुंबईत लालबाग येथे आंब्याचे झाड लावले होते. या झाडाला यंदा भरघोस फळधारणा झाली. मुंबईतील नातेवाइकांना वाटून उरलेले आंबे सूर्यकांत वाजे यांनी भाचे सुधाकर कोटकर यांच्यासाठी एसटीने देवरुखात आणले. वाशी मार्केटमध्ये दररोज कोट्यवधींची उलाढाल होत असताना, कोणत्याही व्यापारिक हेतूशिवाय केवळ कौटुंबिक ओढीपोटी ‘मुंबईचा आंबा’ देवरुखात दाखल झाला. देवरुखात या आंब्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.