कोकण

जिल्हा परिषदेला यशवंत-गुणवंत कर्मचाऱ्यांचा विसर

CD

-rat२५p१४.jpg-
26O39657
रत्नागिरी जिल्हा परिषद
---

जिल्हा परिषदेला गुणवंत कर्मचाऱ्यांचा विसर
आठ वर्षे पुरस्कारच नाही ; २०१७ नंतर यंत्रणेला मुहूर्तच मिळेना!
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. २५ ः रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कारभाराचा ‘सावळा गोंधळ’ सध्या चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर अहोरात्र मेहनत करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी दिला जाणारा ‘यशवंत, गुणवंत कर्मचारी पुरस्कार’ गेल्या ७ ते ८ वर्षांपासून बासनात गुंडाळून ठेवण्यात आला आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे कर्मचाऱ्यांचे कौतुक तर लांबच, पण त्यांच्या हक्काच्या सन्मानाकडेही दुर्लक्ष होत असल्याने जिल्हाभरातील कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे
रत्नागिरी जिल्हा परिषदेत २०१७ मध्ये शेवटचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहा सावंत यांनी पुढाकार घेऊन कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेतली होती. मात्र, त्यानंतर आलेल्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना या परंपरेचा विसर पडला आहे. तब्बल आठ वर्षे उलटूनही अद्याप एकाही कर्मचाऱ्याला या पुरस्काराने गौरविण्यात आलेले नाही.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या विविध विभागांत हजारो कर्मचारी कार्यरत आहेत. शासकीय योजनांची तळागाळातील अंमलबजावणी असो वा प्रशासकीय उद्दिष्ट पूर्ण करणे, कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडत असतात. या कामाची पोचपावती म्हणून प्रशासनाकडून दरवर्षी पुरस्कार दिला जातो. मात्र, ही तरतूद आणि योजना केवळ कागदावरच उरली आहे. वरिष्ठ अधिकारी स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न असताना, ज्या कर्मचाऱ्यांच्या बळावर प्रशासन चालते, त्यांनाच वाली उरलेला नाही, अशी भावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे
​जिल्हा परिषदेने या पुरस्कारासाठी अर्थसंकल्पात तरतूद केलेली असतानाही हा सोहळा का आयोजित केला जात नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या ७-८ वर्षांत जमा झालेला निधी कुठे वळवण्यात आला? प्रशासकीय यंत्रणेला केवळ आदेश काढण्यात रस आहे का? अशा प्रश्नांची सरबत्ती कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.
---
प्रशासनाकडून दुजाभाव
एकीकडे वरिष्ठ अधिकारी आपली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकतात, मात्र त्याच कर्मचाऱ्यांच्या कौतुकासाठी वेळ मिळत नसल्याने प्रशासनाचा ‘दुजाभाव’ उघड झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT