rat26p6.jpg-
39724
प्रा. डॉ. पी. एस. मेश्राम
डॉ. प्रमोद मेश्राम यांना
महाराष्ट्र रत्न पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता.२६ ः सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तालुक्यातील मनोहर हरि खापणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद मेश्राम यांची तेजस सेवा प्रतिष्ठान, संगमनेर (जि. अहमदनगर) या संस्थेतर्फे राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड करण्यात आली आहे.
भारतीय संविधानाच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त संगमनेर येथे ६ जून रोजी ‘संविधान अमृत महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या प्रेरणेने होणाऱ्या या विशेष सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात डॉ. मेश्राम यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. प्रा. डॉ. पी. एस. मेश्राम यांनी आजवर समाजप्रबोधन, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदान तसेच सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या याच कार्याची दखल राज्यस्तरीय पुरस्कार समितीने घेतली आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मनोहर खापणे, उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण, सरचिटणीस नरेश पाचलकर यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी डॉ. मेश्राम यांचे अभिनंदन केले आहे. तसेच डॉ. संदेश वाघ, डॉ. संतोष बनसोड, डॉ. संजय गायकवाड, डॉ. मिता रामटेके, डॉ. रेखा बडोदोकर, प्राचार्य डॉ. यू. सी. राठोड, डॉ. संदीप डोंगरे, डॉ. विकास गवई आदींनीही यशाचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.