कोकण

स्वरोजगारात महिलांचे भविष्य उज्ज्वल

CD

39739

स्वरोजगारात महिलांचे भविष्य उज्ज्वल

सुषमा साखरे ः वागदेत महिला मेळाव्यास प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २६ ः सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गाने समृद्ध आहे, तसा तो विविधतेनेही समृद्ध आहे; पण दुर्दैवाने तो येथील मागासलेपणातही कमी नाही. या जिल्ह्यात समृद्धी निर्माण करायची असेल तर येथील तरुण आणि महिलांनी कौशल्यपूर्ण प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगाराची कास धरणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक सुषमा साखरे यांनी येथे केले.
सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संघ सिंधुदुर्गच्यावतीने शनिवारी (ता. २५) वागदे येथील गोपुरी सभागृहात आयोजित महिला मेळाव्यात त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत कदम होते. निवृत्त उपजिल्हाधिकारी तथा तथागत नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अरविंद वळंजू यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. यावेळी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती रोहिता तांबे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. श्रीमती साखरे म्हणाल्या, ‘‘समाजाची प्रगती ही महिलांवरच अवलंबून आहे. महिलांनीच पुढे येऊन स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वतःची ओळख निर्माण करणे महत्त्वाचे आहे. कामगार न बनता मालक बना.’’

सभापती तांबे यांनी, संविधान आणि बाबासाहेबांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. समाजातील रुढी परंपरा या सोडून परिवर्तनाच्या प्रवाहात या, असे आवाहन केले. डॉ. सराटे यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. श्री. वळंजू यांनी, जिल्ह्यात पहिली पतपेढी या संस्थेने निर्माण केली; मात्र समाजाकडून आवश्यक तेवढे सहकार्य मिळत नाही, अशी खंत व्यक्त केली. प्रा. सुषमा हरकुळकर यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्ष श्री. कदम यांनी पंचशील आचरणात आणा म्हणजे तुम्ही खरे बौद्ध बनाल, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचे पूजन करून झाली. ममता जाधव यांनी भीम गीत सादर केले. दुपारच्या सत्रात महिलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. प्रास्ताविक श्रद्धा कदम यांनी, स्वागत मिलिंद सरपे यांनी केले. सूत्रसंचालन ममता जाधव यांनी केले. स्वाती कदम यांनी आभार मानले.
.....................
पर्यावरणपूरक व्यवसाय करा
उद्योजक मुकुल कुलकर्णी यांनी पर्यावरणाचा ऱ्हास ज्या प्लास्टिकमुळे होतो, ते नष्ट करून पर्यावरणपूरक उद्योग निर्मितीबाबत मार्गदर्शन केले. पर्यावरणपूरक उद्योगात सिंधुदुर्ग हा जगाचा हब बनेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. बचतगटांनी पुढे येऊन या व्यवसायात पुढे यावे. यासाठी आवश्यक सहकार्य करू, अशी ग्वाही दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST workers DA: एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! महागाई भत्त्यात वाढ; वेतन, पेन्शनवरही चर्चा, प्रताप सरनाईकांची घोषणा

Women's T20 World Cup 2026: १२ संघ, २४ दिवस अन् ३३ सामन्यांचा थरार; भारताचे सामने कधी, कुठे आणि किती वाजता? जाणून घ्या सर्वकाही

Farmers Protest March: उद्योगपतींची कर्जे सरसकट माफ; मग शेतकऱ्यांवर कर्जमाफीच्या अटींचे ओझे का?

Latest Marathi News Live Update : परिवर्तन आघाडीच्या नगरसेवकांची बावनकुळे यांनी घेतली भेट, राजकीय चर्चांना वेग

Anvay Dravid In India U19 Team : राहुल द्रविडच्या मुलाची भारतीय संघात निवड! श्रीलंका दौऱ्यासाठी BCCI ची घोषणा, संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT