रामपूर, लोटे येथे
आभा कार्ड नोंदणी
गुहागर ः हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली रविवारी आयुष्मान भारत मार्गदर्शन शिबिर आणि आभा कार्ड नोंदणी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. उद्या (ता. २७) चैतन्य मंगल कार्यालय रामपूर (चिपळूण) येथे सकाळी १० वाजता आणि २८ रोजी क्षुधाशांती हॉटेल, लोटे एमआयडीसी रोड, खेड येथे सकाळी १० वाजता अशा प्रकारे ही शिबिरे होणार आहेत.
----------
शृंगारपूर येथे ३० पासून
वैशाख पौर्णिमा उत्सव
चिपळूण ः श्री भैरीभवानी प्रचितगड सेवा संस्था शृंगारपूर (ता. संगमेश्वर) येथे कुलस्वामिनी भैरीभवानी मूळ पीठ श्री शेत्र शृंगारपूर येथे श्री भैरी भवानी मंदिराचा वैशाख पौर्णिमा उत्सव ३० एप्रिल व १ मे रोजी होणार आहे. दोन दिवसांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन संस्थानाच्या मार्फत केले आहे. यामध्ये शास्त्रोक्त धार्मिक विधी, नवचंडी होम, देवीचा गोंधळ असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. दिनांक ३० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता सर्व देवतांचे अभिषेक, षोडशोपचारे पूजा, गणेश पूजन, नांदी श्राद्ध पुण्याहवाचन, ब्रह्मादि मंडळ, कुंकुमार्जन श्री सप्तशती पाठ व त्यानंतर दुपारी १ वाजता महानैवैद्य व महाआरती सायंकाळी ७ वाजता सुमधुर भजन व रात्रौ ९ वाजता नमन असे विविध कार्यक्रम होणार आहेत. दुसऱ्या दिवशी १ मे रोजी सकाळी ८ वाजता षोडशोपचारे पूजा, देवता पूजन, गृहस्थापना, अग्निस्थापना, कुंकूमार्चन ,कुमारिका पूजन, सुवासिनी पूजन, नवचंडी हवन व त्यानंतर १ वाजता महानैवेद्य व महाआरती व सायंकाळी देवीचा गोंधळ इत्यादी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
--------
खेडमध्ये भाजपचा
मंगळवारी जनता दरबार
खेड ः भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांचे विशेष कार्य अधिकारी (एसडीओ) संतोष साखरे यांचा जनता दरबार मंगळवारी (ता. २८) सार्वजनिक बांधकाम खात्याचे शासकीय विश्रामगृह डाग बंगला येथे सकाळी १० ते ४ या वेळेमध्ये होणार आहे. यात खेड तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांनी आपल्या भागातील मंत्रालय, महसूल, आरोग्य, एसटी, महावितरण, बांधकाम खाते, जिल्हा परिषद बांधकाम, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग, कृषी खाते विकास कामे, भूमी अभिलेख, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस, नगर प्रशासन आणि इतर विभागातील समस्या, तसेच शासकीय दिरंगाईची कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. नागरिकांनी आपली निवेदने घेऊन या जनता दरबारामध्ये सामील व्हावे, असे आवाहन भाजपा नेते ॲड. वैभव खेडेकर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.