कोकण

भाट्ये किनाऱ्यावर पोलिसांची गस्त

CD

भाट्ये किनाऱ्यावर पोलिसांची गस्त
अनैतिक प्रकारांवर नियंत्रण ; त्या व्हिडीओनंतर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ ः शहरानजीकच्या भाट्ये समुद्रकिनाऱ्यावरील खडकाळ भागात अश्लील चाळे करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. यामधून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलीस दल सतर्क झाले असून, भाट्ये समुद्र किनाऱ्यासह भगवती किल्ल्यावर चोविस तास पहारा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भाट्ये येथील तो व्हिडिओ व्हायरल होताच सर्वस्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या घटनेची तातडीने दखल घेत रत्नागिरी शहर पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांवर गस्त वाढवली आहे. विशेषतः भाट्ये टेबल पॉइंट, भगवती किल्ला आणि समुद्रकिनारी आता पोलिसांची विशेष नजर असणार आहे. शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी काल (ता. २५) दुपारी आपल्या टीमसह भाट्ये टेबल पॉइंट येथे जाऊन परिस्थितीची पाहणी केली. सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि अशा अनुचित प्रकारांना चाप लावण्यासाठी त्यांनी विविध भागांत गस्त घालण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी सांगितले की, "पर्यटन स्थळांच्या ठिकाणी अश्लील चाळे करताना कोणीही आढळल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील." पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अनैतिक गोष्टी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP राजकारणात मोठा ट्विस्ट! लोकप्रियता टिकली, पण मंत्री अडचणीत; ३३ मंत्र्यांवर जनतेची नाराजी उघड

IPL 2026 Point Table: 'साई'कृपा! गुजरात टायटन्सचा शानदार विजय! चेन्नई सुपर किंग्सला नमवून गुणतालिकेत घेतली मोठी झेप...

Farmer Agri Theft Paithan: पाचोड परिसरात शेतकऱ्यांच्या पंप-केबल चोरीचा कहर; विहिरींना पाणी असूनही पिके होरपळली

CSK vs GT Live: Ohh shit! चेन्नईच्या खेळाडूच्या तोंडावर चेंडू आदळला, डोळा थोडक्यात वाचला; काळजाचा ठोका चुकला

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको! महाराष्ट्र सरकारचे शाळांसाठी कडक मान्सून नियम; पण कोणते? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT