कोकण

शिरगाव जि. प. शाळेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

CD

शिरगाव शाळेच्या सुरक्षेचा प्रश्न
रस्त्यावर गतिरोधक नाही ; ग्रामस्थांमध्ये नाराजी
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २७ ः शिरगावमधील विलासनगर जिल्हा परिषद शाळेसमोरील मुख्य रस्त्यावर अद्याप एकही गतिरोधक बसवण्यात आलेला नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा हा गंभीर प्रश्न असून, तातडीने गतिरोधक बसवावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. येथील शाळेला ९६ वर्षे पूर्ण होत आहेत.
शिरगाव हे गुहागर मतदारसंघात येते. येथील प्राथमिक शाळेसमोरील रस्त्यावर गतिरोधक बसवण्यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कार्यवाही झालेली नाही, असे ग्रामस्थांचे मत आहे. शिरगाव ग्रामीण भागात येत असल्याने येथील विकास आणि विद्यार्थ्यांच्या जिवाचा प्रश्न प्रशासनाला गौण वाटतो का? असा प्रश्न उपस्थित करीत आहेत. मुख्यमंत्री सडक योजनेतून शिरगावचा आठ किलोमीटरचा मुख्य रस्ता नुकताच पूर्ण झाला आहे. यासाठी शासनाने सुमारे चार कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, एवढा मोठा खर्च करूनही शाळेसमोर वेगाने जाणाऱ्या वाहनांना चाप लावण्यासाठी गतिरोधक का केले नाहीत, यावरून ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन गतिरोधक बसवावेत, अशी आग्रही मागणी शिरगाववासीयांनी केली आहे.
याबाबत शिवाजीराव भोसले म्हणाले, कुळवंडी येथील खासगी शाळा, मिर्ले जिल्हा परिषद शाळा आणि खोपी येथील कॉलेजसमोर मुख्य रस्त्यावर दोन-दोन गतिरोधक बसवण्यात आले आहेत. मग शिरगाव जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक समोरील रस्त्यावर गतिरोधक का नाहीत? हे गणित आकलनापलीकडे आहे. ही शाळा महाराष्ट्र शासनाच्या पटलावर आहे की नाही, याचे उत्तर आमदार, खासदार आणि पंचायत समिती सदस्यांनी द्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Haveli News : १५ वर्षांनंतर यशवंत साखर कारखान्याच्या जमिन विक्रीला मुहूर्त; पुणे बाजार समितीकडून ४९.१८ एकर खरेदी

Hadapsar News : वयाची तीन वर्षे पूर्ण होण्याआधीच 'इयारा'च्या नावे चौदा प्रकारचा दस्तऐवज

'Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघातूनच मी वगळलं असतं...' श्रीलंकेविरुद्धच्या भांडणानंतर संजय मांजरेकरांचं खळबळजनक भाष्य

काळाचा थरकाप उडवणारा दिवस! माळीण दुर्घटनेवर आधारित 'एक होतं माळीण' चित्रपट 'या' दिवशी रिलीज होणार!

बँकेपेक्षा जास्त व्याज, जोखीम शून्य! पोस्ट ऑफिसपासून PPF पर्यंत... 'या' ५ सरकारी योजनांमध्ये मिळतोय आकर्षक परतावा

SCROLL FOR NEXT