swt273.jpg
39947
मुळदे ः उद्यानविद्या महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेच्या पहिल्या तुकडीच्या निरोपप्रसंगी उद्योजक अजित राणे व प्राध्यापक वर्ग. (छायाचित्र ः अजय सावंत)
फलोत्पादन देशाचा आर्थिक कणा ठरेल
अजित राणे ः मुळदे उद्यानविद्या महाविद्यालयात शुभेच्छा सोहळा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २७ ः आपल्या देशातील उद्यानविद्या आणि शाश्वत शेतीच्या विकासात योगदान देण्यास सज्ज असलेल्या तरुण मनाचा उत्साह आणि निष्ठा प्रत्यक्ष पाहणे, हे खरोखरच स्फूर्तिदायक होते. फलोत्पादनातील दृष्टिकोन आणि भारताचा कृषी कणा मजबूत करण्यात युवक महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक अजित राणे यांनी मुळदे येथे केले.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कार्यरत उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथे राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) पहिल्या तुकडीचा (२०२३-२६) निरोप समारंभ मोठ्या उत्साहात झाला. ‘पहिल्या एनसीसी तुकडीचा सन्मान’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या ऐतिहासिक तुकडीने ‘सी’ प्रमाणपत्र परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. ही तुकडी महाविद्यालयातील एनसीसी युनिटची पहिली तुकडी असल्याने संस्थेच्या इतिहासात त्यांना विशेष स्थान प्राप्त झाले आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अजित राणे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. एस. एस. गुरव (शिक्षण प्रभारी), डॉ. गिरीश उईके (एनएसएस प्रभारी), बीएचएम बलवंत सिंग (पीआय स्टाफ, ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी), प्रा. हर्षवर्धन वाघ (सीटीओ, एनसीसी युनिट) तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व एनसीसी कॅडेट्स उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. व्ही. दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी एनसीसी कॅडेट्सचा ज्युनिअर कॅडेट्सतर्फे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते ''एनसीसी-सी'' प्रमाणपत्र पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात कॅडेट जानकी साळुंके व कॅडेट सिमिन गार्दी यांनी सूत्रसंचालन केले. वरिष्ठ व कनिष्ठ कॅडेट्सनी आपल्या एनसीसी प्रवासातील अनुभव कथन केले. यावेळी महाविद्यालयाचे माजी सहयोगी अधिष्ठाता व माजी कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर यांचे एनसीसी युनिट स्थापनेतील मोलाचे योगदान विशेषत्वाने नमूद करण्यात आले. माजी सहयोगी अधिष्ठात्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कॅडेट साईराज नारवेकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.