कोकण

व्यवसाय प्रशिक्षणातून सक्षमतेचे धडे

CD

swt275.jpg
39949
कुडाळ ः थंड पेये बनवण्याच्या व्यावसायिक प्रशिक्षण वर्ग समारोपप्रसंगी मराठा समाज भगिनी मंडळाच्या अध्यक्षा डॉ. दीपाली काजरेकर, सदस्या व प्रशिक्षणार्थी. (छायाचित्र ः अजय सावंत)

व्यवसाय प्रशिक्षणातून सक्षमतेचे धडे
कुडाळात महिलांना मार्गदर्शन ः थंड पेय, पदार्थांची प्रात्य़क्षिके
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २७ ः येथील सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई संचालित मराठा समाज भगिनी मंडळ कुडाळच्या वतीने मराठा समाज हॉल येथे थंड पेये बनवण्याचा व्यावसायिक प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. त्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
उन्हाळा वाढत असताना सर्वांनाच गरजेची असणारी मॉकटेल्स, सरबते, शेक आणि बरेच काही बनवण्याचे मार्गदर्शन या प्रशिक्षणात करण्यात आले. दीपप्रज्वलन आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांचे स्वागत झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय शेफ तनीश राणे, अनंत राऊळ, सचिन सावंत, अमेय तेंडुलकर या टीमने विविध प्रात्यक्षिके दाखविली. मॉकटेल्समध्ये ब्लू लगून मॉकटेल, स्पायसी ग्वावा मॉकटेल, कच्चा कैरी मॉकटेल, पिना कलोडा मॉकटेल, रोज पुदिना मिक्स मॉकटेल आदी विविध प्रकारांची संपूर्ण माहिती व प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. सरबतांमध्ये कैरी, कोकम, आवळा, पुदिना, वाळा यांचे मार्गदर्शन केले. सॅलड्समध्ये ताज्या फळांची व भाजीपाल्याची सॅलड्स दाखवण्यात आली.
रायतामध्ये तंदुरी रायत्यासह विविध प्रकारांची माहिती देण्यात आली. सजावट म्हणून टोमॅटो बटरफ्लाय, टोमॅटोची फुले, कांदापातीची फुले यांची प्रात्यक्षिके दाखविली. या प्रशिक्षण वर्गाला जिल्ह्यातील साठ महिलांनी सहभाग घेतला. भगिनी मंडळाच्या अध्यक्षा डॉ. दीपाली काजरेकर यांनी प्रमाणपत्रे देऊन त्यांचा गौरव केला. तज्ज्ञ मार्गदर्शकांना सन्मानचिन्हे गौरविण्यात आले. रुपाली शिरसाट, संगीता नलावडे यांनी शिबिराचे कौतुक केले. कार्यक्रमाला स्थानिक समिती प्रमुख आर. एल. परब, नंदकिशोर गावडे, साक्षी सावंत यांचे सहकार्य लाभले. प्रज्ञा राणे, निधी दळवी, वेदिका सावंत, सीमा परब यांनी सहकार्य केले. भगिनी मंडळाच्या उपाध्यक्षा स्वाती सावंत, सचिव निर्मला पाटील, सदस्या रश्मी नेमळेकर, सुषमा घोगळे, शीतल दळवी, दीपश्री परब, रेखा नाईक, आदिती सावंत, प्रणाली चव्हाण, नेहा परब, भक्ती सावंत उपस्थित होत्या. महेंद्र गवस यांनी हॉल व बैठक व्यवस्था उपलब्ध करून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RCB Live: ८ धावांत ६ फलंदाज बाद! भुवनेश्वर, हेझलवूडचा कहर! साहिलचा त्रिफळा उडाल्यावर विराटने काय केलं पाहा... Video

'मटका किंग'मध्ये एवढी मोठी चूक? नागराज मंजुळे विसरले पण प्रेक्षकांच्या नजरेतून नाही सुटली ती गोष्ट, म्हणतात- अरे...

अमेरिकन लोक चीनमधून मागवत घर बांधण्याचं सामान! बाजारात ‘चायना होम्स’ची एंट्री; हा नवा ट्रेंड नेमका आहे तरी काय?

Sindkhed Raja Water Crisis : सिंदखेड राजा तालुक्यातील अपूर्ण पाणीपुरवठा योजना तात्काळ पूर्ण करा; निकृष्ट कामांवर कारवाईचे निर्देश आ. मनोज कायंदे

Who is Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सने १८ वर्षीय नाशिकच्या पोराला दिली पदार्पणाची संधी; ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकलेय वादळी शतक, Video

SCROLL FOR NEXT