swt274.jpg
39948
कुडाळ : दुर्बिणीच्या सहाय्याने आकाशदर्शन घेताना विद्यार्थी. (छायाचित्र : अजय सावंत)
‘चला कुडाळ घडवूया’ उपक्रम कौतुकास्पद
आमदार महेश सावंत : आकाशदर्शनला खगोलप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २७ : राजकीय माणसासाठी सामाजिक बांधिलकी महत्वाची असते. ‘चला कुडाळ घडवूया’ या उपक्रमातून मंदार शिरसाट यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांनी जे उपक्रम राबविले आहेत ते कौतुकास्पद आहेत, असे प्रतिपादन माहीमचे आमदार महेश सावंत यांनी केले. आकाशदर्शन कार्यक्रमाला खगोलप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
नगरसेवक मंदार शिरसाट यांनी ‘चला कुडाळ घडवूया’ या उपक्रमांतर्गत येथील बॅ. नाथ पै विद्यालयाच्या पटांगणात ‘आकाश दर्शन व खगोलशास्त्र करियर संधी’ हा कार्यक्रम झाला. उद्घाटन प्रसंगी आमदार सावंत बोलत होते. खगोल तज्ज्ञ तथा विज्ञान पत्रकार मयुरेश प्रभुणे आणि त्यांच्या टीमने विद्यार्थी आणि पालकांना आकाशदर्शन घडविले. कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि माहीमचे आमदार सावंत यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, सारस्वत बँकेचे संचालक सुनील सौदागर, कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, अनिल कुलकर्णी, ठाकरे सेने तालुका प्रमुख राजन नाईक, बबन बोभाटे, अमरसेन सावंत, अवधूत मालंडकर, संतोष शिरसाट, मनोज वालावलकर, अमोल सामंत, आयोजक मंदार शिरसाट, सुशील चिंदरकर आदी उपस्थित होते.
खगोल शास्त्राची माहिती आणि त्याविषयीची आवड विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून होईल, असा विश्वास श्री. नाईक यांनी व्यक्त केला. आकाशाविषयी प्रत्येकाच्या मनात उत्सुकता असते ती उत्सुकता जागविण्याचे काम आणि या क्षेत्रातील करियरच्या संधी याविषयीची माहिती या उपक्रमातून मिळत असल्याचे श्री. पारकर यांनी सांगितले. कार्यक्रमस्थळी उभारलेला चांदोबाचा सेल्फी पॉईंट बच्चे कंपनीचा आकर्षण बिंदू ठरला होता. निलेश गुरव यांनी सुत्रसंचालन केले.
चौकट
लेझर शोद्वारे राशी नक्षत्र दर्शन
उदघाटन सोहळ्यानंतर खगोल तज्ज्ञ तथा विज्ञान पत्रकार मयुरेश प्रभुणे यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. सध्या भारतातील मुलांना अंतराळवीर बनण्याची चांगली संधी असून आवड असेल तर त्यांनी या क्षेत्रात यायचा विचार करावा असे श्री. प्रभुणे यांनी सांगितले. त्यानंतर तीन दुर्बिणीच्या साहाय्याने विद्यार्थी आणि पालक यांनी आकाशदर्शन केले. चंद्र आणि आकाशातील इतर ग्रह, तारे दाखविण्यात आले. लेझर शोच्या माध्यमातून राशी नक्षत्र व आकाशातील विविध गोष्टी दाखवण्यात आल्या. यावेळी सुमारे ३०० हुन जास्त विद्यार्थांनी याचा लाभ घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.