कोकण

शालेय गुणवत्तेसाठी मुख्याध्यापकांनी पुढाकार घ्यावा

CD

- ratchl२७१.jpg ः
26O39956
चिपळूण ः कृतीसत्रात गुणवंत मुख्याध्यापकांचा गौरव करताना डॉ. विलास पाटील, सोबत मान्यवर.

शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी पुढाकार घ्या
डॉ. विलास पाटील ः रत्नागिरीत मुख्याध्यापकांसाठी कृतीसत्र
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २७ ः शिक्षण ही शर्यत नसून ती एक मॅरेथॉन आहे. शिक्षण म्हणजे केवळ मोठे होणे नव्हे तर ‘चांगले माणूस’ होणे असून, तो मनाचा एक उत्सव आहे. शालेय गुणवत्ता वाढवण्यासाठी मानवी घटक, भौतिक सुविधा आणि शैक्षणिक व्यवस्थापन या सर्वांमध्ये उत्कृष्टतेची पातळी गाठणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘सारथी’चे कार्यकारी अधिकारी डॉ. विलास पाटील यांनी केले.
रत्नागिरी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग आणि जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आजचे शैक्षणिक वास्तव व मुख्याध्यापकांची भूमिका’ या विषयावरील एकदिवसीय जिल्हास्तरीय कृतीसत्रात ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ उद्योजक आर. डी. सामंत आणि शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित उपस्थित होते. या सोहळ्यात जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘नंदादीप’ कार्य अहवालाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. व्यक्त केली. या कार्यक्रमाला जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अय्युब मुल्ला, उपाध्यक्ष संजय चव्हाण, सचिव महेश पाटकर, माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष सागर पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुका संघटनांचे पदाधिकारी व मुख्याध्यापक उपस्थित होते.
---
नऊ मुख्याध्यापकांना पुरस्कार
सोहळ्यात जिल्ह्यातील नऊ मुख्याध्यापकांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. त्यात पुरस्कार विजेत्या मुख्याध्यापकांमध्ये संदेश कोकाटे (चिपळूण), रामचंद्र कापसे (मंडणगड), प्रमोद गमरे (दापोली), पोपट जगताप (खेड), पांडुरंग हासबे (गुहागर), रिझवान कारिगर (संगमेश्वर), मुलाणी चाँदसाहेब (लांजा), मधुकर थुळ (रत्नागिरी), राजश्री नारे (राजापूर) यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RCB Live: ८ धावांत ६ फलंदाज बाद! भुवनेश्वर, हेझलवूडचा कहर! साहिलचा त्रिफळा उडाल्यावर विराटने काय केलं पाहा... Video

अमेरिकन लोक चीनमधून मागवत घर बांधण्याचं सामान! बाजारात ‘चायना होम्स’ची एंट्री; हा नवा ट्रेंड नेमका आहे तरी काय?

'मटका किंग'मध्ये एवढी मोठी चूक? नागराज मंजुळे विसरले पण प्रेक्षकांच्या नजरेतून नाही सुटली ती गोष्ट, म्हणतात- अरे...

Pune Domestic Violence Case: महिला पोलीस अंमलदाराचाच सासरकडून छळ; पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Nashik News : एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांकडून मृत्युपत्राची नोंद; ॲड. एकबोटे यांना ‘इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड्स’तर्फे प्रमाणपत्र

SCROLL FOR NEXT