कोकण

रत्नागिरी-टुडे पान १ साठी, संक्षिप्त

CD

नऊ साप्ताहिक गाड्यांना
संगमेश्वरमध्ये थांबा द्या
संगमेश्वर : कोकण रेल्वेसंदर्भात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक घडामोडी घडल्या आहेत. कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी स्थानिक मागण्यांबाबत सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. पद्मश्री गजानन माने यांच्या पुढाकारातून ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकावर ९ साप्ताहिक गाड्यांच्या थांब्याची मागणी करण्यात आली. त्यापैकी ५ गाड्यांच्या थांब्यासंदर्भात सकारात्मक प्रस्ताव लवकरच रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात येणार असून, त्यावर अनुकूल निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच तिरुवनंतपुरम स्पेशल गाडीला संगमेश्वर येथे थांबा देण्याबाबत सादर केलेल्या निवेदनावरही लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी संगमेश्वर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १ व २ वर डिजिटल कोच पोजिशन इंडिकेटर बसवण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. मांडवी एक्स्प्रेस ही गाडी रात्री सुमारे ८.३० वाजता दिवा स्थानकावर न थांबता पुढे जाते, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने या गाडीला दिवा स्थानकावर थांबा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
---------
रत्नागिरी शहरातील
वृक्षतोडीमुळे तापमानवाढ
रत्नागिरी ः शहरातील मुख्य रस्ते व अंतर्गत रस्त्यांच्या कडेला नव्याने उभ्या राहणाऱ्या इमारतींमुळे अनेक छोटी-मोठी झाडे तोडली जात आहेत. शहर विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर तोडली जात असल्याने शहरात तापमानवाढीचा सामना करावा लागत आहे. शिवाय रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण झाल्यामुळेही हा धोका वाढल्याचा इशारा पर्यावरण तज्ज्ञांनी दिला आहे. गेल्या काही वर्षांत रस्ते रुंदीकरण, पायाभूत सुविधा प्रकल्प आणि विविध विकासकामांच्या निमित्ताने शहरातील अनेक वृक्षांची कत्तल करण्यात आली. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून, हिरवळ झपाट्याने कमी होत आहे. परिणामी शहरातील उष्णता लाटांचा प्रभाव अधिक तीव्र होत असून नागरिकांना कडक उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. सावलीत उभे राहण्यासाठी शहरातील मुख्य रस्त्यावर झाडच शिल्लक राहिलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: उद्यापासून वन-डेचा थरार! टीव्ही अन् मोबाईलवर LIVE मॅच कधी, कुठे पाहायची? जाणून घ्या वेळ

Kalyan: निर्दयीपणाचा कळस! जन्मानंतर अवघ्या सहा दिवसांतच चिमुकलीला कचऱ्यात टाकलं; कल्याणमध्ये हृदयद्रावक घटना

१.७ लाखांचा पगार... तरी महिनाअखेर खात्यात उरतात फक्त २,५२० रुपये; प्रत्येक मध्यमवर्गीयाने वाचावी अशी गोष्ट

‘Biryani Is Dinner, Not Consent’: ₹370 बिर्याणी वादात व्हायरल झालेल्या “Biryani Bhej Du” फेक नोटिफिकेशनवर Zomato ची प्रतिक्रिया

Vidhan Parishad Election : जळगावात निर्णय होईना! अद्याप भाजपला पाठिंबा नाहीच; वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT