40041
शेजवली ः निनादेवी देवस्थानच्या वर्धापन दिनी पालख्यांचे दर्शन घेताना भाविक.
शेजवलीतील निनादेवी मंदिराचा
वर्धापनदिन सोहळा उत्साहात
तळेरे : शेजवली येथील श्री निनादेवी मंदिराच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी (ता. २६) विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. या कार्यक्रमांना विविध पालख्या आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अभिषेक, श्री सत्यनारायण महापूजा, श्री निनादेवी वाल्ये, श्री निनादेवी जुवाठी, श्री भराडी देवी बांदिवडे, श्री जुगाई देवी कोर्ले, श्री देव गांगेश्वर गुंजवणे, श्री देव आदिनाथ वायंगणी या देवतांच्या पालखीचे आगमन ढोल-ताशांच्या गजरात झाले. दुपारी उपस्थित भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. त्यांनतर वाल्ये, कोर्ले, जुवाठी, गुंजवणे, बांदिवडे, वायंगणी, शेजवली येथील ढोल पथकांनी आपली कला सादर केली. ढोल-ताशांच्या गजरात उपस्थित सर्व देवतांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भक्तिमय वातावरणात शेजवली निनादेवी देवस्थान परिसर रंगून गेला होता. उपस्थित सर्व भाविकांचे शेजवली मुंबई व ग्रामस्थांच्यावतीने स्वागत करण्यात आले. या उत्सवाला रत्नागिरी, सिंधुदुर्गसह मुंबईस्थित चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---
40038
शिडवणे शाळेमध्ये संस्कारमूल्यांचे धडे
तळेरे : विद्यार्थ्यांमध्ये सुसंस्कार आणि जीवनोपयोगी मूल्यांची रुजवणूक व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिडवणे क्र. १ येथे जीवन विद्या मिशनच्या वतीने विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुरेखा नर उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक मूल्ये आणि संस्कारांचे सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यासपीठावर जनार्दन नर, शाळेच्या पदवीधर शिक्षिका हेमा वंजारी, अंगणवाडी सेविका प्रियांका पाटणकर, मदतनिस कविता केतकर उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांच्या मूल्यवर्धनासाठी असे उपक्रम मैलाचा दगड ठरतात, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षक वृंद यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. या उपक्रमासाठी देणगीदार सुधाकर नर यांचे विशेष सहाय्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.