कोकण

चांदोर येथे आंबा व्यापाऱ्यास मारहाण

CD

चांदोर येथे आंबा व्यापाऱ्यास मारहाण
पावस ः चांदोर येथे आंबा व्यापाऱ्यास गाडीतून ओढून मारहाण करुन सोन्याच्या चेनचे नुकसान केले. या प्रकरणी संशयिताविरुद्ध पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. प्रतीक खरात (वय २२, रा. मुळ खानवली, ता. लांजा. सध्या रा. सापुचेतळे) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २५) रात्री साडेनऊच्या सुमारास चांदोर येथे घडली. फिर्यादी रमेश बाबू भोजे (वय ४९, रा. चांदोर, दोन आंबावाडी. रत्नागिरी) यांना संशयित प्रतीक खरात याने फिर्यादीच्या मोबाईलवर फोन करुन तुम्ही माझ्या चालकाला धमकी दिली का असे विचारले. त्यावेळी रमेश भोजे यांनी धमकी दिली नाही असे सांगितले. त्यावेळी संशयित शिवीगाळ करुन त्रास देवू लागला म्हणून रमेश भोजे हे संशयित प्रतिक याला ओळखत असलेल्या माणसाला मोटार घेऊन सापुचेतळे येथे भेटायला गेले. त्यावेळी प्रतीक खरात याने भोजे यांची गाडी पुढे जाऊन थांबविली आणि त्यांना बाहेर ओढून लाकडी दांडक्याने मारहाण केली.
.......
नाणीजजवळ मोटारीच्या धडकेत दोघे जखमी
रत्नागिरी ः नाणीज-जुनामठ येथे पुढे अपघात झालेला माहित असताना देखील निष्काळजीपणे मोटार चालवून दोघांना ठोकर दिली. या अपघातात दोघे जखमी झाले. संशयित चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. वासिम अब्दूल रहेमान (वय ४०, रा. राजिवडा, मच्छीमार्केट, रत्नागिरी) असे संशयित मोटार चालकाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २६) रात्री आठच्या सुमारास कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्गावर नाणीज-जुनामठ रस्त्यावर घडली. संशयित चालक वासिम रेहमान हे मोटार घेऊन रत्नागिरीकडे येत असताना कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर अपघात झालेला आहे. हे माहिती असताना वाहन चालवून करण बाळकृष्ण शिवगण (वय २५, रा. नाणीज, शिवगणवाडी, रत्नागिरी) व प्रथमेश विनोद बेंद्रे (२४ रा. मिरजोळे, हनुमानवाडी, रत्नागिरी) या दोन तरुणांना धडक दिली.
--------------
मद्यपानानंतर गैरवर्तन; चौघांविरोधात गुन्हा
रत्नागिरी ः शहरातील पांढरा समुद्र-मिरकरवाडा जाणाऱ्या रोडवर मुरुगवाडा येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करुन आरडाओरडा व गैरवर्तन करणाऱ्या चार जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. अनिरुद्ध त्रंबक फडके (वय ४२, रा. जरग नगर, करवीर, कंळंब. कोल्हापूर), सौरभ सुरेश साळुंखे (३८, रा. ता. करवीर, जि. कोल्हापूर), नितीन पोवार (रा. कोल्हापूर) व सुयश साळुंखे (रा. कोल्हापूर दोघांचेही पुर्ण नाव पत्ता माहित नाही) अशी संशयितांची नावे आहे. ही घटना रविवारी (ता. २६) दुपारी अडीचच्या सुमारास पांढरा समुद्र मिरकरवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली.
--
बेशुद्ध तरुण रूग्णालयात मृत घोषित
रत्नागिरी ः बेशुद्धावस्थेत आढळलेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. शैलेश अनंत सावंत (वय ३८, रा. वाजाई शिळ, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २६) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शैलेश सावंत हे वाडकर स्टॉप ब्रीजच्या बाजूच्या पिकअप शेड शिळ, येथे बेशुद्धावस्थेत पडलेले आढळले. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.
--
पश्चिम बंगालमधील कामगाराचा मृत्यू
रत्नागिरी ः गणपतीपुळे येथे भाड्याच्या खोलीत रहाणाऱ्या कामगाराला चक्कर आली. दुसऱ्या दिवशी उपचारासाठी मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. नाजिमुल लुतफर रहमान मुल्ला (वय २८, रा. पश्चिम बंगाल) असे मृत कामगाराचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २६) सकाळी अकराच्या सुमारास मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Vande Bharat News: पुणे रेल्वे स्थानकावर मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा अपघात कसा झाला? कारण आलं समोर, चौकशीचे आदेश

Axar Patel Reaction : मलाच काही समजत नाहीए...! RCB ने दिलेल्या धक्क्यानंतर अक्षर पटेल गोंधळला; म्हणतो, आता काय पुढे...

Pune Charity Commissioner : पारदर्शक न्यायदान हाच न्यायव्यवस्थेचा कणा : पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त दिनेश कोठलीकर यांचा कार्यभार स्वीकारताना निर्धार

Virat Kohli Record! विराट कोहलीने IPL इतिहासात कोणालाच न जमलेला विक्रम केला, पहिला फलंदाज ठरला; रोहित खूपच लांब राहिला

Mohol Crime : पैशाच्या वादातून एकाचा खून, एक गंभीर जखमी; आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT