swt२७२८.jpg
४०१११
विजयदुर्ग ः येथील खाडीत जलतरण स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू.
विजयदुर्ग खाडीत जलतरणाचा थरार
स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद ः राज्यातील ११० खेळाडूंचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २७ ः तालुक्यातील विजयदुर्ग खाडीत खुली जलतरण स्पर्धा घेण्यात आली. विजयदुर्ग येथील श्री दुर्गामाता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेचे नियोजन जिम स्विमिंग अकॅडमी कोल्हापूर यांनी केले. स्पर्धेत राज्याच्या विविध भागातील स्पर्धकांसह, कर्नाटक व गोवा राज्यांतील मिळून एकूण ११० जलतरणपटूंनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेचे उद्घाटन राज्य जलतरण संघटनेचे अध्यक्ष आनंद माने यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी रविकांत राणे, दीपक करंजे, अकॅडमीचे अजय पाठक, कोल्हापूर जिल्हा जलतरण संघटनेचे सुशील पाटील, स्पर्धा निरीक्षक कैलास आखाडे उपस्थित होते. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ धाराशीव जलतरणचे पांडुरंग रणखांब, ठाण्याचे श्री. मोरे, कोल्हापूर जलतरणचे प्रवीण भंडारी, कपिल मेथे, शुभांगी मंगलोरकर, तेजस्विनी मेथे, विश्वनाथ घोरपडे, रविकांत राणे, दीपक करंजे, प्रदीप साखरकर आदींच्या उपस्थितीत झाला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल अनुक्रमे असा, वयोगट ७ वर्षे मुले ः पाचशे मीटर -आदेश जाधव (रत्नागिरी), निवेश व्हावळ (ठाणे), कियान मेथे, तर रत्नागिरीच्या चार वर्षाच्या इजहान कापडे याने स्पर्धा पूर्ण केली. ७ वर्षांखालील मुली ः ५०० मीटर -अद्विका गौडा (कर्नाटक), गाथा दड्डीकर (बेळगाव), शीशा मयूर (ठाणे), ९ वर्षांखालील मुले ः एक किलोमीटर -हर्षवर्धन कर्लेकर (बेळगाव), मयंक चव्हाण (कोल्हापूर), सिद्ध मुपीनिट्टी (ठाणे), मोहक गौडा (कर्नाटक), गुरुराज पाटील (कोल्हापूर), ९ वर्षांखालील मुली ः एक किलोमीटर-दुर्वा चव्हाण (कोल्हापूर), गुणिश्का येल्लाजी (बेळगाव), ११ वर्षांखालील मुले ः एक किलोमीटर -अर्णव पिळणकर (रत्नागिरी), स्कंद गाडगे (बेळगाव), कर्णसिंह घोरपडे (कोल्हापूर), विहान दळवी (रत्नागिरी), ज्ञानेश गोईलकर (कोल्हापूर), ११ वर्षांखालील मुली ः एक किलोमीटर-वैष्णवी शिरोडकर (गोवा), समयरा भोसले (गोवा), सोयरा मनोलकर (बेळगाव), कादंबरी काकडे (कोल्हापूर), प्रणामय्या प्रभू (बेळगाव), १३ वर्षांखालील मुले ः दोन किलोमीटर-शौर्या राऊत (रत्नागिरी), पुनेत बंग (कोल्हापूर), अभय तवंदकर (कोल्हापूर), रंजन कुलकर्णी (बेळगाव), अर्णव भंडारी (कोल्हापूर), ११ वर्षांखालील मुली-कृष्णा हार्व्याशी (कोल्हापूर), संपिता व्हावळ (ठाणे), धृती कोळी (ठाणे), काव्या मेथे (कोल्हापूर), त्रिधा फणसेकर (ठाणे), १५ वर्षांखालील मुले ः दोन किलोमीटर-वरुणराज डोंगळे (कोल्हापूर), विधान धुरी, मेघराज डोंगळे (कोल्हापूर), अंजनेय काटकर (कोल्हापूर), आयुष कटाळे (रत्नागिरी), १५ वर्षांखालील मुली ः तीन किलोमीटर-राजनंदिनी तिवले (कोल्हापूर), अनन्या पत्की (कोल्हापूर), निधी भिडे (रत्नागिरी), अनुष्का बजाज (कोल्हापूर), मानवी बंग (कोल्हापूर), १७ वर्षांखालील मुले ः तीन किलोमीटर -आदित्य बर्गे, पार्थ शेट्टी (कर्नाटक), रुद्र मनाडे (कोल्हापूर) आयुष काळे (रत्नागिरी), योगेंद्र तावडे (रत्नागिरी), १७ वर्षांखालील मुली ः तीन किलोमीटर -चैत्राली नवले (सातारा), सानवी पवार (रत्नागिरी), आरोही पिळणकर (रत्नागिरी), प्राजक्ता प्रभू (बेळगाव), वृंदा गोईलकर (कोल्हापूर), २१ वर्षांखालील मुले ः पाच किलोमीटर - भाग्येश पालव (सिंधुदुर्ग), स्मरण मंगलोरकर (बेळगाव), पुष्कर गवळी (कोल्हापूर), आत्मज अकोलकर (ठाणे), रोहित पटेकर (ठाणे), २१ वर्षांखालील मुली ः पाच किलोमीटर-तनया मिलके (रत्नागिरी), श्रावणी रणखांब (धाराशिव)
चौकट
स्पर्धेत ३५ वर्षांखालील पुरुष ः पाच किलोमीटर-करण मिलके (रत्नागिरी), अल्फराज कापडे (रत्नागिरी), ३५ वर्षांखालील महिला पाच किलोमीटर-समिधा मोरे (ठाणे), गौरी राऊत (ठाणे), ५० वर्षांखालील पुरुष ः दोन किलोमीटर-राजू कलकुटगी (कोल्हापूर), रमेश बंग (कोल्हापूर), विपुल पवार (मुंबई), महेश पवार (धाराशिव), ५० वर्षांखालील महिलाः दोन किलोमीटर -गौरी मिलके (रत्नागिरी), रेखा अमयप्पन (ठाणे), असिता पवार (पुणे), ५१ वर्षांवरील पुरुष ः दोन किलोमीटर-श्रीमंत गायकवाड (सातारा), अजित पिळणकर (रत्नागिरी), ५१ वर्षांवरील महिला-गायत्री फडके (पुणे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.