- rat२८p४.jpg-
26O40130
साखरपा : जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांना निवेदन देताना चक्रभेदीच्या वैदेही सावंत.
‘निराधार’चे मानधन वेळेवर द्या
चक्रभेदीची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. २८ ः संजय गांधी निराधार पेन्शन योजना आणि बालसंगोपन योजनेचे पैसे नियमित आणि ठराविक तारखेला मिळावेत, या मागणीसाठी ‘चक्रभेदी सोशल फाउंडेशन’तर्फे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांना निवेदन सादर करण्यात आले. फाउंडेशनच्या अध्यक्षा वैदेही सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन गरजूंच्या समस्यांकडे लक्ष वेधले.
निराधार व्यक्ती तसेच एकल महिलांना सध्या दरमहा दीड हजार रुपये पेन्शन मिळते; मात्र, ही रक्कम नियमितपणे मिळत नसल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. अनेकदा दोन-तीन महिने ही रक्कम रखडते, ज्यामुळे अत्यंत गरीब कुटुंबांची मोठी आर्थिक ओढताण होते. बालसंगोपन योजनेच्या बाबतीतही अशीच अनियमितता दिसून येत असल्याने दरमहा ठराविक तारखेला हे मानधन मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्याच्या महागाईच्या काळात दीड हजार रुपयांची मदत अत्यंत अपुरी असल्याचे मत वैदेही सावंत यांनी व्यक्त केले. ही पेन्शन वाढवून किमान पाच हजार रुपये करण्यात यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. यासाठी चक्रभेदी सोशल फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. सावंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिंदाल यांची भेट घेऊन या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. प्रशासनाने यावर तातडीने मार्ग काढून पेन्शन वितरणात सुसूत्रता आणावी, अशी विनंती फाउंडेशनच्यावतीने करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.