Vidarbha Rain Alert
esakal
पुणे : राज्यात उष्णतेची लाट कायम असतानाच विदर्भासाठी काहीसा दिलासादायक अंदाज हवामान विभागाने (Maharashtra heatwave latest update) वर्तविला आहे. उद्यापासून (ता. २९) विदर्भातील अनेक भागांत पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून, काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने संबंधित जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.