Southern China flood emergency
esakal
बीजिंग : चीनच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून अनेक शहरांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण (China flood latest news) झाली आहे. किनझोऊ शहरात रविवारी (ता. २६) पासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे रस्ते, घरे आणि पार्किंग परिसर पाण्याखाली गेले आहेत. प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेत तातडीने बचावकार्य सुरू केले असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.