कोकण

पनीर, चीजमध्ये भेसळ केल्यास कारवाई

CD

40197

पनीर, चीजमध्ये भेसळ केल्यास कारवाई
अन्न, औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त : खरेदी बिलावरील अन्नपदार्थाचा उल्लेख तपासावा
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २८ : जिल्ह्यातील रेस्टॉरंट, कॅटरर्स, हॉटेल्स /फास्ट फूड विक्रेते, चीज ॲनालॉगचे उत्पादक, पनीरचे उत्पादक, पुरवठादार यांनी भेसळ केल्यास कठोर कारवाईचा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त ललित गायकवाड यांनी दिला आहे. खरेदी बिलावर अन्नपदार्थाचा स्पष्टपणे उल्लेख आहे की नाही याची खात्री करूनच अन्नपदार्थ खरेदी करावेत, असे आवाहनही गायकवाड यांनी केले.
अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ हा जनहित व जन आरोग्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा कायदा असून सर्वसामान्य जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे हा त्याचा प्रमुख उद्देश व उद्दिष्ट आहे. भारत हा दुग्ध उत्पादनात अग्रगण्य देश असून, पनीर हा भारतीय आहाराचा एक महत्त्वाचा घटक आहे. पनीर केवळ चविष्टच नाहीतर पोषणमूल्यांनी समृद्ध असल्यामुळे त्याच्या आहारात विशेष स्थान आहे. पनीरमध्ये प्रथिने, कॅल्शियम ही जीवनसत्वे आणि आवश्यक खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात. शाकाहारी लोकांसाठी पनीर हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. ‘डेअरी ॲनालॉग’ हा दूध व्यतिरिक्त इतर खाद्यतेल, स्टार्च, इमल्सिफायर व इतर घटक वापरून बनविलेला पदार्थ आहे. तो पनीरसारखा दिसतो पण ‘पनीर’ नाही. एफएसएसएआयच्या मानांकानुसार हा ‘चीज ॲनालॉग’ या प्रवर्गात मोडतो.
अन्न व औषध प्रशासन ग्राहकांच्या आरोग्याबाबत दक्ष असून अन्नातील भेसळ व दिशाभूल करणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कटिबद्ध आहे. ग्राहकांनी अशा प्रकारची दिशाभूल झाल्यास त्याबाबत तक्रार प्रशासनाच्या ०२३६२-२२८८८१ या क्रमांकावर नोंदवावी असेही आवाहन केले आहे.


चौकट
ग्राहकांची फसवणूक
अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग यांच्या निदर्शनास आले आहे, की काही रेस्टॉरंट/ केटरर्स, हॉटेल्स, फास्ट फूड विक्रेते या आस्थापनांमध्ये अन्न पदार्थ तयार करताना चीज ॲनालॉगचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्याबाबत सदर आस्थापनांकडून ग्राहकांना पुरेशी माहिती उपलब्ध करून देण्यात येत नसल्याकारणाने ग्राहकांची दिशाभूल व फसवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तथापि बाजारात काही ठिकाणी पनीरॲनालॉग, चीज अनालॉग हे पदार्थ पनीर किंवा "चीज या नावाने किंवा त्या सारख्या नावाने विकले जात आहेत. त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होत आहे.

चौकट
ग्राहकांनी घ्यावयाची काळजी
पनीर खरेदी करताना पॅकबंद उत्पादनावरील लेबल काळजीपूर्व वाचा. ॲनालॉग असा उल्लेख आहे का ते तपासा. सुटे पनीर खरेदी करताना विक्रेत्यांकडे ते शुद्ध दुधापासून बनवलेला आहे का याची खात्री करा. संशय असल्यास बिल मागा. हॉटेलमध्ये मेनू कार्डवर पनीर व चीज ॲनालॉग हे दोन स्वतंत्र अन्न पदार्थ आहे का याची खात्री करावी व त्याप्रमाणे आपल्याला जो पदार्थ पाहिजे त्याची ऑर्डर करावी. ॲनालॉग हा आरोग्यास अपायकारक नाही. परंतु त्यातील घटक व पोषण मूल्य पनीरपेक्षा वेगळी असतात .त्यामुळे ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी योग्य माहिती असणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT