कोकण

रत्नागिरी जिल्ह्यात २७ हजार नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

CD

जिल्ह्यात २७ हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा
६ तालुक्यांना पाणीटंचाईची झळ; उन्हाचा कडाका वाढला
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ ः एप्रिल महिना संपत आला असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. जिल्ह्यातील ९ पैकी ६ तालुक्यांमध्ये टंचाईने उग्र रूप धारण केले असून, सध्या १५ टँकरने ३२ गावांतील ७८ वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. या तीव्र टंचाईचा फटका जिल्ह्यातील सुमारे २७ हजार ८३२ नागरिकांना बसला आहे.
वाढत्या उन्हामुळे जिल्ह्यातील नद्या, विहिरी आणि धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने आटत चालला आहे. परिणामी, ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या मंडणगड, चिपळूण, खेड आणि रत्नागिरी या चार तालुक्यांमध्ये टंचाईची तीव्रता सर्वाधिक असून, येथे प्रशासनाकडून टँकरच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. सध्या जिल्ह्यात एकूण १५ टँकर सुरू आहेत. त्यापैकी शासकीय टँकर ३ व खासगी टँकर १२ आहेत. आतापर्यंत ३२ गावे आणि ७८ वाड्यांमध्ये मिळून एकूण ६९२ टँकरच्या फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यातील सहा तालुक्यांत टंचाई भासत असली तरी लांजा, राजापूर आणि गुहागर या तीन तालुक्यांत अद्याप अधिकृतपणे टँकरने पाणीपुरवठा सुरू झालेला नाही; मात्र, उन्हाचा तडाखा असाच राहिल्यास मे महिन्यात या तालुक्यांतूनही टँकरची मागणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाणीटंचाईचे हे संकट पाहता प्रशासनाकडून टंचाई निवारण आराखड्याची अंमलबजावणी वेगाने सुरू असून, नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.


चौकट
तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा
तालुका गाव वाड्या टँकर बाधित लोक
मंडणगड ३ ३ १ २२४९
दापोली १ १ १ १४१
खेड ८ १५ १ ९९०
चिपळूण ८ १५ १ १४२६
रत्नागिरी ९ ३७ १० २२ हजार ६०९
संगमेश्वर ३ ५ १ ४१५
---------------------------------------------------------------
एकूण ३२ ७८ ०३ २७ हजार ८३२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 2 दिवसांतच भावात मोठा बदल; मुंबई-पुणेसह महाराष्ट्रात आजचा दर किती?

ENG W vs SL W : रेकॉर्ड ब्रेकिंग मॅच! इंग्लंडचा दणदणीत विजय अन् श्रीलंकेविरुद्ध विक्रमांचा पाऊस; टीम इंडियाचाही विक्रम मोडला

Sex Determination Racket: गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश! पुण्यातून सहावे सोनोग्राफी मशीन जप्त; डॉक्टर, एजंट आणि गर्भपात केंद्रे पोलिसांच्या रडारवर

Nashik Rainfall : पावसाचे दिवस 40 ते 45 वर घसरले; बदलत्या पॅटर्नमुळे शेती अस्थिर, पीकवाढीचे चक्रच कोलमडले, 2019-2015 ची आकडेवारी काय सांगते?

नागपूर-पुणे एक्स्प्रेस रद्द, अनेक गाड्यांच्या स्थानकांसह वेळेत बदल; मध्य रेल्वेला ट्राफिक ब्लॉकचा फटका

SCROLL FOR NEXT