कोकण

गुहागर ः सरकार देईल खाटल्यावरी ही भूमिका मारक

CD

बालसंगोपन योजनेपुढील आव्हान ः भाग ३ .... लोगो

40225

सरकार देईल खाटल्यावरी ही भूमिका मारक
पालकांची भूमिका उदासीन; अंमलबजावणीत होतो ताप
मयुरेश पाटणकर : सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २८ : बालसंगोपन योजना अपेक्षेप्रमाणे गती न घेण्यात पालकांचीही उदासीनता कारणीभूत आहे. शिक्षक, सरकारी यंत्रणा यांनी काम करण्याची अपेक्षा आहेच. त्याला स्वयंसेवी संघटनांची जोड मिळाली तरी पालकांचा सहभागही तेवढाच महत्त्वाचा आहे. याबाबत काही ठिकाणी तुम्हीच आम्हाला सर्व घराशी आणून द्या मग आम्ही योजनेचा लाभ घेतो, अशी पालकांची भूमिका आढळली. अर्थात, या साऱ्यावर मात करणे आवश्यक आहे.
बालसंगोपनसाठी पात्र बालके निवडताना शिक्षक हा घटक सर्वात उत्तम ठरू शकतो; मात्र इच्छाशक्ती हवी. दीर्घकाळ ती जाणवत नव्हती. ही बाब जिल्हा परिषदेच्या संवेदनशील मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या कानी घातल्यावर त्यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषदेतील शिक्षणखाते थोडेसे हलले. शिक्षकांच्या व शाळांकरवी जमा झालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यामध्ये पात्र बालके ३१००हून अधिक असल्याचे निष्पन्न झाले. या साऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे. एकल पालक असलेल्या बालकांना ही योजना लागू करता येते; मात्र एकल पालक असलेले प्रत्येक मूल हे या योजनेचे लाभार्थी असते, असे नाही. कारण, ही योजना म्हणजे रमणा वाटावा अशा तऱ्हेने पैसे वाटण्याची योजना नाही.
या वेळी गुहागरमध्ये सुमारे २०३ एकल पालकांची संख्या होती. शिक्षकांबरोबर पाठपुरावा करावा म्हणून अनुलोमच्या या संस्थेच्या ग्रामीण पातळीवरील मित्रांनी पालक-शिक्षक यांच्याकडे पाठपुरावा केला. पालकांना सातत्याने कागदपत्र पूर्ततेविषयी आठवण केली. उत्पन्नाच्या दाखल्यासंदर्भामध्ये आम्ही व्यवस्था करू; पण तुम्ही त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे द्या, असे सांगितले; परंतु आम्ही काहीही करणार नाही. तुम्ही घरात आम्हाला सगळ्या गोष्टी आणून द्या, अशीच भूमिका अनेक पालकांची दिसली. हे केवळ गुहागरमध्येच घडतंय, असं नाही तर चिपळूण आणि खेडमध्येसुद्धा पालकांकडून अशाच प्रकारचे वर्तन अनुभवायला मिळालं.

चौकट
प्रस्ताव तयार होण्यात अडथळे
जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामीण भागातील हायस्कूल शिक्षक दरवर्षी एकल पालक असलेल्या पाल्यांची यादी तयार करतात आणि त्या पाल्याचे कागदपत्र जमा करून अर्ज भरून घेतात; परंतु ही कागदपत्रे भरत असताना मयत पालकाचा दाखला देणे, रहिवासी असल्याचा दाखला आणणं, अशी छोटी छोटी कामसुद्धा पालक करत नाहीत आणि त्यामुळे एकल पालक योजनाचा प्रस्ताव तयार होत नाही, ही बाब गंभीर आहे.

(समाप्त)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Hydrogen Fuel Statement : पेट्रोल-डिझेल गाड्या होणार बंद? नितीन गडकरींचं मोठं विधान; आता पेट्रोलऐवजी 'या' इंधनावर धावणार गाड्या!

Hadapsar Fire : सिलेंडरमधून गॅस गळती होवून लागलेल्या आगीत दुकाने जळून खाक, दोनजण जखमी

Latest Marathi News Live Update : सोलापूर जिल्ह्यातील भोंदूबाबा मनोहर भोसलेला दिलासा नाहीच; 2 मे'पर्यंत पोलिस कोठडीत वाढ

PBKS vs RR Live: २,४,६,४,४,१, ४! प्रियांश आर्यने ७ चेंडूंत राजस्थानला झोडले; जोफ्रा आर्चर कर्णधार रियानवर संतापला, नेमकं काय घडलं?

नायिका म्हणून गाजवलं दशक, आता ९ वर्षांनंतर पुन्हा मराठी सिनेमात! निशिगंधा वाड यांचं चित्रपटसृष्टीत कमबॅक

SCROLL FOR NEXT