- rat२८p१७.jpg-
26O40194
हापूस आंबा
----
मद्रास आंबा ‘हापूस’ म्हणून विक्री
शौकतभाई मुकादम ः ग्राहकांची फसवणूक, कृषी विभागाने कारवाई करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २८ ः रत्नागिरी आणि देवगड हापूसची जागतिक ओळख व प्रतिष्ठा सध्या धोक्यात आली आहे. बाजारपेठेत मद्रासच्या आंब्याची ‘हापूस’ म्हणून विक्री करून ग्राहकांची सरळ फसवणूक केली जात आहे, असा आक्षेप पंचायत समितीचे माजी सभापती व पर्यावरणप्रेमी शौकतभाई मुकादम यांनी घेतला आहे. या प्रकाराची कृषी विभागाने तातडीने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यंदा कोकणातील हापूसचे उत्पादन कमी आहे. त्यामुळे दरही वधारलेले असून, सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. अजूनही हापूस डझनला ६०० रुपयांपासून पुढे विकला जात आहे. परिणामी, काही व्यावसायिक हापूसऐवजी अन्य आंबे विक्री करत आहेत. याबाबत मुकादम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, याकडे कृषी विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन केले आहे. काही परप्रांतीय विक्रेते मद्रासच्या आंब्याला हापूस असल्याचे सांगून विकत आहेत, ज्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. या प्रकारामुळे रत्नागिरी-देवगड हापूसच्या गुणवत्तेबाबत ग्राहकांमध्ये गैरसमज निर्माण होत असून, ब्रँडची बदनामी होत आहे. या फसव्या विक्रीमुळे स्थानिक शेतकरी, अधिकृत व्यापारी आणि ग्राहकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. मद्रासचा आंबा विकण्यास बंदी नाही; परंतु त्याला ‘हापूस’ म्हणणे हा गुन्हा आहे, असे मुकादम यांनी स्पष्ट केले. परराज्यातून येणाऱ्या गाड्यांमधून हा आंबा आणून तो स्थानिक बाजारपेठेत हापूसच्या नावाखाली खपवला जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या पार्श्वभूमीवर, तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांनी बाजारपेठेत फिरून वस्तुस्थितीची तपासणी करावी. तसेच, जे व्यापारी अशा प्रकारे फसवणूक करत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी मुकादम यांनी केली आहे.
----
हापूस कसा ओळखावा
* खऱ्या हापूसचा सुगंध लांबूनच येतो आणि तो खूप गोड असतो.
* हापूस फार मोठा नसतो. तो मध्यम आकाराचा, अंडाकृती असतो.
* पिकल्यावर सोनेरी-केशरी रंगाचा होतो.
* पिकलेल्या हापूसच्या देठाकडचा भाग थोडा दबला जातो आणि तिथे थोडा लालसरपणा असतो.
* हापूसची साल अतिशय गुळगुळीत असते.
* आंबा हातात घेतल्यास तो वजनाला हलका लागतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.