कोकण

राज्याचा ६७ वा स्थापना दिन

CD

राज्याचा ६७ वा स्थापना दिन

रत्नागिरी ः महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापनादिनानिमित्त शुक्रवारी (ता. १) सकाळी ८ वा. पोलिस परेड ग्राउंड येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. या प्रसंगी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात येथे महाराष्ट्र दिन नियोजनाबाबत बैठक झाली. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) विश्वजित गाताडे, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, प्रांताधिकारी जीवन देसाई आदींसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिंदल म्हणाले, ‘‘मुख्य शासकीय ध्वजवंदनाचा कार्यक्रम पोलिस परेड ग्राउंड येथे सकाळी ८ वाजता होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर कार्यालयांनी अथवा संस्थांनी या दिवशी सकाळी ७.१५ ते ९ वा.च्या दरम्यान ध्वजवंदनाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजवंदन समारंभ आयोजित करायचा असल्यास त्यांनी तो सकाळी ७.१५च्या पूर्वी किंवा सकाळी ९ च्या नंतर आयोजित करावा.

खेड येथे गुरुवारी समाधान शिबिर
खेड ः खेड तालुक्यातील भरणे येथील नवभारत हायस्कूलमध्ये गुरुवारी (ता. ३०) १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर होणार आहे. सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांनी केले आहे. महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नाचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये मंडळ स्तरावर अशा शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

टाळसुरे येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर
दापोली ः तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत टाळसुरे व न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज टाळसुरे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर ३० एप्रिलला सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज टाळसुरे, ता. दापोली येथे पार पडणार आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांविषयी योग्य दिशा मिळावी तसेच यूपीएससी, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वा. दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने होणार असून, १०.१५ वा. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात येईल. त्यानंतर १०.३० वा. स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षांविषयी शैक्षणिक मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे. मार्गदर्शन शिबिरासाठी अनुभवी मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत. यात प्रा. विनंजय चिंगळे (एमए इकॉनॉमिक्स), संस्थापक, कर्मवीर आयएएस इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स, कऱ्हाड यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा १६ वर्षांचा अनुभव असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली २००हून अधिक विद्यार्थ्यांची विविध पदांवर निवड झाली आहे. तसेच प्रा. शैलेश कंकळे (एमए, नेट-सेट–पॉलिटिकल सायन्स), संचालक, कर्मवीर आयएएस इन्स्टिट्यूट, कऱ्हाड यांना १५ वर्षांचा अध्यापन अनुभव असून, प्रा. अनिकेत घाटील (एमटेक-एनर्जी सिस्टिम) यांनाही १० वर्षांचा स्पर्धा परीक्षा विषयक अध्यापनाचा अनुभव आहे.

देवरूख येथे १२ मे पासून शिबिर
देवरूख ः सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटर, देवरूख येथे तीनदिवसीय उन्हाळी शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर १२, १३ आणि १४ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. यामध्ये ५ वी ते ९ वीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या कॅम्पमध्ये फन सायन्स, डेमॉन्स्ट्रेशन, आर्ट अँड क्राफ्ट, पोस्टर मेकिंग, स्टोरीटेलिंग, मुव्ही इव्हिनिंग, पझल आणि ब्रेन टीझर सेशन, नाईट स्काय वॉचिंग तसेच फन गेम्स अशा विविध आकर्षक उपक्रमांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनासोबतच सर्जनशीलता आणि बौद्धिक विकास घडवणे, हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

बाबो... सहा चेंडूंत सहा विकेट्स! इंग्लिश गोलंदाजाचा भीमपराक्रम, १६ धावांत घेतले ७ बळी, संघाला मिळवून दिला ११६ धावांनी विजय

PBKS vs RR Live: स्टॉयनिसने लाज वाचवली! पंजाबला दोनशेपार पोहोचवले; राजस्थानच्या गोलंदाजांनी केला होता करेक्ट कार्यक्रम

SCROLL FOR NEXT