कोकण

चिपळूण ः संदेश कोकाटे यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार

CD

संदेश कोकाटे यांना
गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार
चिपळूण, ता. २८ ः श्रीमती रुक्मिणीबाई माटे शिक्षणसंस्था कामथे संचलित, नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, डुगवे शिरवली (ता. चिपळूण) येथील मुख्याध्यापक संदेश कोकाटे यांना रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचा ‘जिल्हास्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार’ प्रदान केला. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ आणि समर्पित सेवेची दखल घेऊन हा गौरव करण्यात आला आहे.
कोकाटे हे जून १९९२ पासून या विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेत सलग अनेक वर्षे १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. केवळ अभ्यासातच नव्हे, तर विज्ञान उपक्रम, क्रीडा स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात आपले नैपुण्य सिद्ध केले आहे. संस्थेचे संस्थापक स्व. लोकनेते बाळासाहेब माटे आणि विद्यमान अध्यक्ष डॉ. विजयशेठ माटे यांचा विश्वास त्यांनी आपल्या कार्यातून सार्थ ठरवला आहे. शांत, संयमी आणि प्रामाणिक स्वभाव असलेल्या कोकाटे सरांनी संस्थाचालक, शिक्षक, कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थ यांच्याशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले आहेत. विद्यालयाच्या जडणघडणीत शालेय समितीच्या अध्यक्षा माधुरी गोखले आणि सर्व सदस्यांचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभत आहे. या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजयशेठ माटे, ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी तसेच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. या पुरस्कारामुळे चिपळूण तालुक्याच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Yellow Alert Maharashtra : विदर्भाला उष्णतेपासून दिलासा! उद्यापासून पूर्वमोसमी पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांना Yellow Alert, मराठवाडा-पुण्यात काय स्थिती?

शैलजा ते शैलेश... राजश्री देशपांडेचा थक्क करणारा प्रवास! 'बाप्या' चित्रपटाचा ट्रेलर एकदा पाहाच

Latest Marathi News Live Update : उष्माघातापासून वाहनचालकांना दिलासा, उद्यापासून बदलापुरातील सर्व सिग्नल दुपारी बंद राहणार

China Flood Latest News : चीनमध्ये मुसळधार पावसाचा कहर; 2 तासांत 200 मिमी पाऊस, Qinzhou शहरात ढगफुटीसदृश परिस्थिती

Jalgaon Temperature : तापमानाचा पारा ४४ पार; उष्माघाताचा धोका वाढला!

SCROLL FOR NEXT