कोकण

खेड - महावितरणच्या २३ कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

CD

महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ
२३ स्थानिकांना कामावरून केले कमी; राज्यमंत्री योगेश कदम यांना साकडे
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २८ ः महावितरण कंपनीत नवीन पदभरतीमधील कर्मचारी रूजू झाल्यानंतर खेडसह दापोली आणि मंडणगड कार्यक्षेत्रातील २३ स्थानिक कंत्राटी कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून कमी केले आहे. अनेक वर्षांपासून सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली असून, स्थानिक अधिकाऱ्यांकडून दाद मिळत नसल्याने अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांनी राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
खेड, दापोली आणि मंडणगड या तीन तालुक्यांमध्ये महावितरणकडे सुमारे १०० ते १२५ कर्मचारी वर्षानुवर्षे कंत्राटी पद्धतीने वायरमन म्हणून काम करत आहेत. यामध्ये स्थानिक तरुणांसह परजिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे; मात्र, अलीकडेच महावितरणमध्ये नवीन पदभरती झालेले २३ कर्मचारी या तिन्ही तालुक्यांत रूजू झाले. त्यांच्या नियुक्तीनंतर व्यवस्थापनाने परजिल्ह्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम ठेवून २३ स्थानिक कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. यामुळे ‘परजिल्ह्यातील कर्मचारी अधिक प्रिय आणि स्थानिक मात्र वाऱ्यावर’ अशी भावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी यापूर्वी स्थानिक अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती; मात्र, प्रशासनाकडून या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. वर्षानुवर्षे अल्प मानधनावर सेवा देऊनही ऐनवेळी कामावरून काढल्याने या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

चौकट
भूमिपुत्रांना काम द्या
स्थानिक पातळीवर तोडगा निघत नसल्याने हवालदिल झालेल्या कर्मचाऱ्यांनी आता राज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेतली आहे. या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून प्रशासनाला योग्य निर्देश द्यावेत आणि स्थानिक भूमिपुत्रांना त्यांचे काम पुन्हा मिळवून देऊन न्याय द्यावा, अशी विनंती अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द

SCROLL FOR NEXT