कोकण

बँकिंग स्पर्धा परीक्षांची तयारी करा

CD

41108
बँकिंग स्पर्धा परीक्षांची तयारी करा
गावडे ः शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः शिक्षण क्षेत्रात केलेले काम ही भविष्यातील प्रगत भारतासाठी केलेली गुंतवणूक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी केवळ दहावी-बारावीच्या परीक्षेपुरते मर्यादित न राहता, भविष्यात स्पर्धा परीक्षा तसेच बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांसाठी आतापासूनच तयारी करा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे यांनी केले.
सावंतवाडी येथे आयोजित ‘यशवंत शिष्यवृत्ती’ स्पर्धेच्या गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी वडील एकनाथ गावडे, आई सुनिता गावडे, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, उपसभापती गौरव मुळीक, नितीन मुळीक, जिल्हा परिषद सदस्या शोभा गावडे, मायकल डिसोजा, नितीन राऊळ, गटशिक्षणाधिकारी श्रीमती शिंदे, गेळे सरपंच सागर ढोके, अनिकेत आसोलकर, चौकुळ सरपंच गुलाबराव गावडे आदी उपस्थित होते.
श्री. गावडे यांनी यशवंत शिष्यवृत्तीचा आढावा घेतला. हा उपक्रम केवळ सत्कार सोहळा नसून ती एक शैक्षणिक चळवळ आहे, असेही त्यांनी नमूद केले. २०१५ पासून वही वाटपाच्या माध्यमातून सुरू झालेला हा प्रवास आता शिष्यवृत्ती स्पर्धेपर्यंत पोहोचला आहे. माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ शिक्षणाच्या जोरावर देशाला प्रगतीचा मार्ग दाखवणारे संविधान दिले. हीच शिक्षणाची ताकद ओळखून हा उपक्रम घेत असल्याचे सांगितले.
ॲड. निरवडेकर यांनी, यशवंत शिष्यवृत्ती ही स्पर्धा नसून मुलांच्या शैक्षणिक प्रगतीचे पुढचे पाऊल असल्याचे स्पष्ट केले. उपसभापती मुळीक, मायकल डिसोझा, गटशिक्षण अधिकारी परब यांनीही विचार मांडले. यशवंत शिष्यवृत्तीधारक पहिल्या पाच विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप तर पदके मिळाल्या विद्यार्थ्यांना पदके तसेच प्रशस्तीपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Why Hardik Pandya Not Playing Today? हार्दिक MI vs LSG सामना का खेळत नाही? मुंबई इंडियन्सने दिले महत्त्वाचे अपडेट्स; गर्लफ्रेंड कल्चर बंद होणार असल्याने झालाय का नाराज?

पुण्याच्या टीमकडून IPL गाजवणाऱ्या गोलंदाजानं TMC उमेदवाराला लोळवलं; सलग दुसऱ्यांदा झाला आमदार

Daund crime incident: दौंडमध्ये मित्राच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून आरोपी थेट पोलिस ठाण्यात हजर

Nagpur MD Drugs News : नागपुरात ‘ऑपरेशन थंडर’चा धडाका; ३.४१ कोटींचे अमली पदार्थ जप्त, तरीही एमडी शहरात येते कुठून?

Police Recruitment News: अगरवाडगावचे मुस्तकीम रब्बानी पठाण पुणे शहर पोलीस दलात निवड

SCROLL FOR NEXT