कोकण

सोनुर्लीत डॉ. आंबेडकर यांना अभिवादन

CD

swt318.jpg
41141
सोनुर्ली ः ‘खेळ पैठणी’चा स्पर्धेतील विजेत्या महिलांना गौरविण्यात आले.

सोनुर्लीत डॉ. आंबेडकर यांना अभिवादन
जाधववाडीत जयंती सोहळा ः विविध स्पर्धांना महिला, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः नवयुवक कला, क्रीडा मंडळ सोनुर्ली-जाधववाडी यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि महिलांचा गौरव करण्यात आला.
​​कार्यक्रमानिमित्त २८ एप्रिलला प्रश्नमंजुषा स्पर्धा पार पडली. यामध्ये ​पहिली ते चौथी गटात युवराज जाधव, रुद्र जाधव, श्रेयानवियशिका सोनुर्लेकर, ​पाचवी ते सातवी गटात विघ्नेश जाधव, आरोही गावकर, ईशा मालपेकर, ​आठवी ते दहावी गटात चैतन्या गावकर, दुर्वा कदम, शमिका मालपेकर यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले. ​महिलांसाठी आयोजित ‘पदर रमाईचा २०२६’ या प्रबोधनात्मक कार्यक्रमात खेळ पैठणी स्पर्धा घेण्यात आली. यात प्रथम क्रमांक अनुष्का जाधव, द्वितीय शमिका पाडलोसकर आणि तृतीय क्रमांक संजीवनी जाधव यांनी मिळवला. ​​
मंडळातर्फे आयोजित ''जयभीम रिल्स स्टार स्पर्धा'' मध्ये अभिषेक अवटी (आरोस), रोहित जाधव (तळवडे) आणि रोहन कदम (कांदळगाव) यांनी बाजी मारली. ‘भीमगीत गायन’ स्पर्धेत प्रज्ञा सूर्य ग्रुप (आसोली), पंचशील महिला समूह (सरमळे) आणि रमाई कलाविष्कार (मडुरे) यांनी यश संपादन केले. ​​२९ एप्रिलला बुद्ध पूजा पाठ व अभिवादन सभा झाली. प्रमुख व्याख्याते महेंद्र मातोंडकर यांनी ''संविधान आमचा प्राण'' या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले.
नागेश गावकर, संतोष ओटवणेकर, दाजी गावकर, सुस्मिता जाधव व वैदही जाधव यांचा समावेश होता. या ​अभिवादन सभेला सरपंच नारायण हिराप, भरत गावकर, नागेश गावकर, सतीश सोनुर्लेकर, लक्ष्मीदास ठाकूर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Why Hardik Pandya Not Playing Today? हार्दिक MI vs LSG सामना का खेळत नाही? मुंबई इंडियन्सने दिले महत्त्वाचे अपडेट्स; गर्लफ्रेंड कल्चर बंद होणार असल्याने झालाय का नाराज?

पुण्याच्या टीमकडून IPL गाजवणाऱ्या गोलंदाजानं TMC उमेदवाराला लोळवलं; सलग दुसऱ्यांदा झाला आमदार

Daund crime incident: दौंडमध्ये मित्राच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून आरोपी थेट पोलिस ठाण्यात हजर

Nagpur MD Drugs News : नागपुरात ‘ऑपरेशन थंडर’चा धडाका; ३.४१ कोटींचे अमली पदार्थ जप्त, तरीही एमडी शहरात येते कुठून?

Police Recruitment News: अगरवाडगावचे मुस्तकीम रब्बानी पठाण पुणे शहर पोलीस दलात निवड

SCROLL FOR NEXT