- rat३p२५.JPG-
P26O41163
चिपळूण ः देवर्षी नारद पत्रकार सन्मान स्वीकारताना मयुरेश पाटणकर पहिल्या छायाचित्रात, दुसऱ्या छायाचित्रात समीर जाधव, तिसऱ्या गावखडीचे ऋषभ तोडणकर आदी. यावेळी उपस्थित लेखक अभिजित जोग, प्रसाद काथे आणि राजेश जोष्टे आदी.
भारतीय संस्कृती संपविण्याचे जागतिक षडयंत्र
अभिजित जोग ः चिपळूणात देवर्षी नारद पुरस्काराचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ४ : ‘भारतातील कुटुंबव्यवस्था, धर्मसंस्कार आणि देशप्रेम संपविण्यासाठी जागतिक स्तरावरून मोठे प्रयत्न डावी विचारसरणी करत आहे. या धोक्यांबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत अभिजित जोग यांनी मांडले.
ते चिपळूण येथे देवर्षी नारद पत्रकार सन्मान कार्यक्रमात बोलत होते. चिपळूण मधील नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात देवर्षी नारद पत्रकार सन्मान सोहळा झाला. या वेळी प्रसाद काथे, पत्रकार राजेश जोष्टे उपस्थित होते. यावेळी ‘सकाळ’चे बातमीदार मयुरेश पाटणकर यांच्यासह मेघराज जाधव, शेखर सामतं, समीर जाधव आणि गावखडीचे ऋषभ तोडणकर यांना देवर्षी नारद पत्रकार सन्मान देवून गौरविण्यात आले. यावेळी श्री. जोग म्हणाले, अमेरिकेसह अन्य तीन देशांनी निर्माण केलेली डिप स्टेट ही व्यवस्था काही देशांमधील सत्ता उलथवून लावली. जगातील विविध देशात सुदृढ लोकशाही यावी असे दाखवून या देशांना आपल्या प्रभावाखाली आणण्याचा प्रयत्न डिप स्टेटच्या माध्यमातून होत आहे. भारतातही हा प्रयत्न सुरु आहे. त्यासोबत सांस्कृतिक मार्स्कसिझमचा धोकाही आपल्यासमोर आहे.
या कार्यक्रमाला डॉ. निशिथ भांडारकर, संदिप खरे, दत्ता सोलकर, प्रसाद आगवेकर, डॉ. प्रफुल्ल सप्रे, मंदार लेले, डॉ. सुदेश आयरे, डॉ. विकास नातू, मुकुंद कानडे, उदय चितळे, विनायक ओक, कीर्तनकार शरद तांबे, ज्योतिषी खांडेकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.