rat३p३६.jpg -
26O41195
कापसाळ ः येथे दिव्यांग अशोक पवार यांनी उपोषण सोडले
प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा
उपोषण स्थगित ; प्रशासनाचे लेखी आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ ः राजापूर तालुक्यातील मौजे कार्जीडा येथील जामदा मध्यम प्रकल्पाकरिता बुडीत क्षेत्रात असलेले आपले घर, शेत व झाडे संपादित होणार आहेत. या अनुषंगाने संयुक्त मोजणी व भूसंपादन कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पग्रस्त म्हणून आपणास शासन निर्णयाप्रमाणे देय होणाऱ्या दिव्यांगत्वाच्या विशेष लाभाबाबत सक्षम स्तरावरील मंजूरी नंतर कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी आश्वासन उपअभियंता यानी दिल्याने दिव्यांग बांधव अशोक पवार यांनी महाराष्ट्र दिनी सुरू केलेले उपोषण स्थगित केले.
प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रलंबित प्रश्नांसाठी उपोषण केले. २०१३ च्या भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना कायद्याची पारदर्शक अंमलबजावणी करून प्रकल्पग्रस्तांना हक्काचे पुनर्वसन व वाढीव मोबदला मिळावा, या मागणीसाठी पवार यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. आमदार शेखर निकम यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर उपोषण सोडण्यात आले. संबंधित पाटबंधारे अधिकाऱ्यांनी मागण्यांसंदर्भात लेखी हमीपत्र दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.